IPL 2025 Mega Auction : इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात मोठी टी 20 लीग असून याच्या 18 व्या सीजनसाठी 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे मेगा ऑक्शन (IPL 2025 Mega Auction) पार पडले. या ऑक्शनमधून यंदा ऑक्शनमध्ये अनेक युवा खेळाडूंच नशीब चमकलं असून त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट लीगमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) यंदा ऑक्शनमधून असंच एक नवं टॅलेंट हेरलं असून त्याच्या करता तब्बल 4.80 कोटी रुपये मोजले आहेत. तेव्हा हा अल्लाह गझनफर (Allah Ghazanfar) नेमका कोण याविषयी जाणून घेण्यात.
18 वर्षांचा अल्लाह गझनफर हा अफगाणिस्तानचा फिरकीपटू असून त्याने अद्याप त्याचे T20I पदार्पण केलेले नाही, परंतु त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 16 T20 सामन्यांमध्ये त्याने दोनदा चार-विकेट्ससह 29 विकेट्स घेतले आहेत. अल्लाह गझनफरने अफगाणिस्तान संघाकडून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. त्याने एकूण 8 सामन्यात 12 विकेट्स घेतले आहेत. गझनफर ओमानमध्ये झालेल्या इमर्जिंग आशिया कपचा सुद्धा भाग होता. त्याने अफगाणिस्तानकडून खेळताना भारताविरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्मा आणि प्रभसिमरन सिंग यांच्या विकेट्सही घेतल्या होत्या. अफगाणिस्तानने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. गझनफर T10 लीगमध्ये टीम अबू धाबी, क्रिकेट श्पेजिझा लीगमध्ये मिस आइनाक नाइट्स आणि लंका प्रीमियर लीग (LPL) मध्ये कोलंबो स्ट्रायकर्सकडूनही खेळला आहे.
हेही वाचा : धोनीच्या लाडक्याचं घरवापसीचं स्वप्न भंगलं, ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सच्या गळाला लागला
अल्लाह गझनफरने आयपीएलमध्ये स्वतःची बेस प्राईज 50 लाख इतकी ठेवली होती. अल्लाह गझनफर जेव्हा ऑक्शन टेबलवर आला तेव्हा सुरुवातीला कोलकाता नाईट रायडर्सने त्याच्यावर बोली लावली. मग आरसीबीने यात रस दाखवला आणि केकेआर, आरसीबीने गझनफरची बोली 2.20 कोटींपर्यंत पोहोचवली. मग मुंबई इंडियन्सने यात फाईटमध्ये उडी मारत अल्लाह गझनफरसाठी तब्बल 4.80 कोटी रुपये मोजून आपल्या संघात घेतले. आयपीएल 2025 मध्ये अल्लाह गझनफर मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करताना दिसू शकतो.