Jitendra Awhad Facebook Post: संपूर्ण देशाला लक्ष लागलेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल महाविकास आघाडीला धक्का देणारा ठरला. महायुतीने सर्व अंदाज चुकीचे ठरवत तब्बल 234 जागा जिंकल्या आणि राज्यात पुन्हा एकदा सरकार आपलं सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला. महायुतीच्या त्सुनामीसमोर महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवारांचा सुपडा साफ झाला. याचा फटका बाळासाहेब थोरातांसारख्या मातब्बर नेत्यांनाही बसला. मात्र जितेंद्र आव्हाडांसारखे नेते या त्सुनामीत तग धरुन राहिले आणि मोठ्या मताधिक्क्याने जिंकले. या विजयामागे नेमकी काय रणनिती होती याचा खुलासा स्वत: जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली असून सविस्तर माहिती दिली आहे.
माझ्या टीमने ईव्हीएम मशीनसंबंधी प्रक्रियेत पूर्ण गांभीर्याने लक्ष घालत अगदी पहिल्या दिवसापासून या सगळ्या प्रक्रियेवर अगदी करडी नजर ठेवली अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. EVM संदर्भातील छोट्यातील छोट्या गोष्टींवर आम्ही लक्ष ठेवलं.परिणामी कोणतीही धांदली माझ्या मतदार संघात होऊ शकली नाही.आणि मी मोठ्या मताधिक्याने माझ्या मतदार संघातून निवडून आलो असं जितेंद्र आव्हाडांचं म्हणणं आहे.
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..?
1 ऑगस्ट 2024 रोजी ठाणे जिल्ह्यात EVM मशिन्सची FLC प्रक्रिया सुरू होणार असल्याची पहिली नोटीस आम्हाला निवडणूक आयोगाकडून आली.
माझी एक टीम, ज्यामध्ये माझा कार्यकर्ता मोहसीन शेख आणि जिंदा सांडभोर हे त्यांच्या 25 सहकाऱ्यांच्या सोबत पहिल्या दिवसापासून या गोष्टीसाठी सज्ज होते.शिवाय त्यांच्या सोबतीला वकिलांची एक टीम देखील कामाला लागली होती.
जशी ही नोटीस मिळाली,माझ्या या टीमने यात पूर्ण गांभीर्याने लक्ष घालत अगदी पहिल्या दिवसापासून या सगळ्या प्रक्रियेवर अगदी करडी नजर ठेवली.
EVM मशीन संदर्भात,
FLC (First Level Checking)
Randomisation I
Randomisation II
COMMISSIONING
या प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून पार पाडल्या जातात. या प्रत्येक प्रक्रियेवर माझ्या टीमने लक्ष ठेवले. निवडणूक आयोगाकडून हलगर्जीपणा होत असल्यास तो त्यांच्या लक्षात आणून दिला, चुका होत असल्यास त्यात माझी मदत घेऊन त्या दूर केल्या.
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..?
1 ऑगस्ट 2024 रोजी ठाणे जिल्ह्यात EVM मशिन्सची FLC प्रक्रिया सुरू होणार असल्याची पहिली नोटीस आम्हाला निवडणूक आयोगाकडून आली.
माझी एक टीम,ज्या मध्ये माझा कार्यकर्ता मोहसीन शेख आणि जिंदा सांडभोर हे त्यांच्या 25 सहकाऱ्यांच्या सोबत…— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 25, 2024
प्रसंगी संबंधित अधिकारी लोकांच्या सोबत वाद घातले ,गोड बोलून काम करून घेतली. यामागे एक रणनीती होती.ती म्हणजे या लोकांना EVM संदर्भात सुरू असणाऱ्या प्रत्येक बाबींवर लक्ष आहे,याची जाणीव त्यांना करून देण्याची.
अगदी EVM च्या transport देखील आमचं लक्ष होत. दरवेळी EVM एखाद्या ठिकाणावरून दुसरीकडे हलविण्यात येणार असतील तर त्या सगळ्या गाड्यांच्या मागे या टीम मधील लोक आपल्या गाड्या घेऊन निघायचे. हे करताना ECI योग्य ते प्रोटोकॉल पाळत आहे की नाही,यावर देखील त्यांचं लक्ष असायचं आणि काही गडबड असल्यास माझ्या लक्षात आणून द्यायचे.
(एक गाडी without पोलीस प्रोटेक्शन, EVM घेऊन बाहेर निघाली होती,त्या संदर्भातील ट्विट तुमच्या लक्षात असेल.)
ECI च्या सगळ्या प्रक्रिया आम्ही पार पाडल्या असल्याने, आमच्याकडे कोणत्या बूथ वर कोणती मशीन जाणार आहे,याचे तपशील होते. ते आम्ही आमच्या पोलिंग एजंटला दिले. परिणामी आमच्या बुथवर इतर कोणत्या मशिन्स आणण्याची हिम्मत इथ कोणी करू शकल नाही.
Counting ला जाताना देखील माझ्या या काउंटीग एजंटना वरील सगळी माहिती आम्ही दिली होती.त्यांची प्रशिक्षण यावर झाली होती. थोडक्यात सांगायचं तर EVM संदर्भातील छोट्यातील छोट्या गोष्टींवर आम्ही लक्ष ठेवलं.परिणामी कोणतीही धांदली माझ्या मतदार संघात होऊ शकली नाही.आणि मी मोठ्या मताधिक्याने माझ्या मतदार संघातून निवडून आलो...!