प्रेग्नेंसीच्या चर्चेनंतर तेजस्वी-करण कुंद्रा पुन्हा एकत्र, Kiss करतानाचा व्हिडिओ व्हायरल

 यादरम्यान करण कुंद्रा तेजस्वीला Kiss करण्याचा प्रयत्न करताना दिसला.

Updated: Dec 26, 2021, 06:20 PM IST
प्रेग्नेंसीच्या चर्चेनंतर तेजस्वी-करण कुंद्रा पुन्हा एकत्र, Kiss करतानाचा व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : टीव्हीवरील बहुचर्चित आणि वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉसच्या 15व्या सीझनचा प्रवास सुरू असतानाच या शोमधील ड्रामा आणि अॅक्शनही वाढत आहे. बिग बॉसच्या या सीजनमध्ये करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांची जोडी खूप चर्चेत आहे. रोमान्स आणि सतत वाढत जाणारी जवळीक यामुळे हे कपल सतत लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. बिग बॉसच्या घरात बहुतेकदा दोघे एकत्र दिसत आहेत.

करण- तेजस्वीची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते. करण आणि तेजस्वी कधीकधी छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडतात, पण दोघांची केमिस्ट्रीही खूप आवडली आहे. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश एकाच ब्लँकेटमध्ये झोपलेले दिसले. यादरम्यान करण कुंद्रा तेजस्वीला Kiss करण्याचा प्रयत्न करताना दिसला.

तेजस्वीने करण कुंद्राला दिला नकार 

जेव्हा करण कुंद्रा तेजस्वीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता आणि दोघेही एकमेकांना मिठी मारत होते, तेव्हा करण तिला किस करण्याचा प्रयत्न करत होता आणि अभिनेत्रीने त्याला नकार दिला होता. तेजस्वी म्हणाली, 'विचारही करू नकोस' अशी मजेशीर गोष्ट घडली की याचदरम्यान राखी सावंत तिच्या हॉरर स्टाईलमध्ये तिथे पोहोचली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

टीआरपी वाचवण्यासाठी पुन्हा आली राखी सावंत?

राखी सावंतला पाहून करण भडकला आणि म्हणाला - ओये. बिग बॉस या रिअ‍ॅलिटी टीव्ही शोची जेव्हा टीआरपी घसरायला लागतो, तेव्हा शोमध्ये राखी सावंतची एन्ट्री होते. राखी सावंत आतापर्यंत अनेक सीझनमध्ये बिग बॉसमध्ये दिसली आहे. यावेळीही ती बिग बॉसमध्ये वेगवेगळे लूक घेऊन लोकांचे मनोरंजन करत आहे.