प्रियंका, दीपिकानंतर 'ही' अभिनेत्री झळकणार हॉलिवूडमध्ये

अभिनेत्री हुमा कुरेशी सुद्धा हॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमवण्यास सज्ज झाली आहे.

Updated: May 30, 2019, 10:18 PM IST
प्रियंका, दीपिकानंतर 'ही' अभिनेत्री झळकणार हॉलिवूडमध्ये title=

मुंबई : अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि प्रियंका चोप्रा यांनी हॉलिवूड कलाविश्वात आपल्या अभिनयाच्या जोरावर विशेष स्थान मिळवले आहे. या अभिनेत्रींच्या पाठोपाठ आता बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी सुद्धा हॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमवण्यास सज्ज झाली आहे. 'आर्मी ऑफ द डेड' चित्रपटाच्या माध्यमातून हुमा हॉलिवूड गाजवणार आहे. हॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे हुमा फार खुश आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Live like it's not a rainy day#livevictoriously @greygoose @fetch_india @pankhurifetch Dress - @anguskirkbyworld Earrings - @officialfaberge Shoes @sophiawebster @frozenpixelstudios @atrayeeduttagupta #greygooselife cannes #2019 #cannes2019

A post shared by Huma Qureshi (@iamhumaq) on

ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून हुमाच्या हॉलिवूड पदार्पणाची घोषणा केली आहे. 'आर्मी ऑफ द डेड' चित्रपटाच्या माध्यमातून जॅक स्नायडर, जॉम्बी शैली पुन्हा चित्रपट सृष्टीत पदार्पण करणार आहेत. याआधी त्यांनी 'डॉन ऑफ द डेड' चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.   

अमेरिकन चित्रपट निर्माते जॅक स्नायडर यांच्या 'आर्मी ऑफ द डेड' चित्रपटात हुमा भूमिका साकारणार आहे. मुख्य भूमिकेसाठी हुमाची निवड करण्यात आली आहे. हुमा शिवाय चित्रपटात एला पुर्नेल, ऍना डे ला रेगुएला आणि थियो रॉसी हे कलाकार भूमिका साकारणार आहेत.