शिल्पा शेट्टीला बॉलिवूड स्टार्सची साथ, टोलर्सविरोधात उठवला आवाज

त्यानंतर आता आणखी काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर लोकांच्या शब्दांना उत्तरं द्यायला सुरुवात केली आहे.

Updated: Aug 1, 2021, 03:58 PM IST
शिल्पा शेट्टीला बॉलिवूड स्टार्सची साथ, टोलर्सविरोधात उठवला आवाज

मुंबई : बिझनेसमन राज कुंद्राच्या अटकेनंतर सोशल मीडियावर लोक अभिनेत्री शिल्पा शेट्टीला सतत ट्रोल करत आहेत. शिल्पाच्या विरोधात अनेक पोस्ट शेअर केल्या जात आहेत. अशा परिस्थितीत आता अनेक बॉलिवूड स्टार्स शिल्पाच्या समर्थनासाठी पुढे येत आहेत. दिग्दर्शक हंसल मेहता यांनी शिल्पा शेट्टीला उघडपणे पाठिंबा दिला. त्यांनी एकापाठोपाठ एक तीन ट्विट करत शिल्पाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 

त्यानंतर आता आणखी काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर लोकांच्या शब्दांना उत्तरं द्यायला सुरुवात केली आहे.

रिचा चड्ढाचा शिल्पाला सपोर्ट 

दिग्दर्शक हंसल मेहता यांच्यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा शिल्पा शेट्टीच्या समर्थनासाठी पुढे आली आहे. हंसल मेहता यांच्या ट्विटला रिट्विट करत रिचाने लिहिलं आहे की, "आपण महिलांना त्यांच्या जीवनात पुरुषांनी केलेल्या चुकांसाठी दोषी ठरवणं हा जणू राष्ट्रीय खेळ बनवला आहे. आनंद आहे की तिने कायदेशीरित्या पाऊल उचलायला सुरुवात केली आहे आणि ती लढत आहे."

हंसल मेहता यांनी ट्रोलर्सला खरी-खोटी सुनावली

दिग्दर्शक हंसल मेहता यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शिल्पा शेट्टीला तिचा स्पेस देण्याची विनंती केली आहे. सोबतच न्याय मिळण्यापूर्वी कोणाला दोषी असल्याप्रमाणे वागणूक देणे चुकीचे असल्याचं ही त्यांनी म्हटलं आहे.