पतीच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी पहिल्यांदाच मुलीसोबत घराबाहेर

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणी अजून संपलेल्या नाहीत. 

Updated: Aug 29, 2021, 12:57 PM IST
पतीच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी पहिल्यांदाच मुलीसोबत घराबाहेर

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणी अजून संपलेल्या नाहीत. पती राज कुंद्राविरोधात पॉर्नोग्राफी अंतर्गत कारवाई सुरू आहे. या अडचणींमध्ये शिल्पा स्वतःला सांभाळायला शिकली आहे. सोशल मीडिया आणि प्रोफेशनल लाईफमध्ये तिचे पुनरागमन याची साक्ष देते. अलीकडेच शिल्पा आणि तिची मुलगी समीशाला घेऊन घराबाहेर पडली होती.

शिल्पा तिची मुलगी समिशाला घेऊन गाडीत बसताना दिसत आहे. ती जुहूमधील तिच्या घराच्या बाहेर कारने जाताना दिसली. या दरम्यान, फोटोग्राफर्सने तिचे फोटो काढले, ज्याला शिल्पाने देखील हसत प्रतिसाद दिला.
राज कुंद्रा प्रकरणानंतर शिल्पा सुपर डान्सर चॅप्टर 4 च्या सेटवर दिसली. आता ही पहिलीच वेळ आहे जेव्हा ती सामान्य दिवसांप्रमाणे आपल्या मुलीसोबत बाहेर दिसली आहे.

या दरम्यान, शिल्पा जीन्स-पांढरा ओव्हरसाईज स्वेटशर्ट आणि शुज घातलेली दिसली. तिने अगदी कॅज्युअल लुक कॅरी केला होता.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शिल्पाची मुलगी समीशा गुलाबी रंगाचा फ्रॉकमध्ये दिसली. तसेच गुलाबी हेअरबँड आणि गुलाबी बोमध्ये ती अधिकच क्यूट दिसत होती. 

पती राज कुंद्राच्या प्रकरणानंतर शिल्पाने मीडियापासून अंतर ठेवले आहे. मात्र, योगा करताना त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर ती पोस्ट करताना दिसत  आहे. शिल्पाने सांगितले की, योगाच्या माध्यमातून या कठीण काळातही ती स्वतःला शांत ठेवत आहे.