ऋषभ शेट्टीला 'कांतारा'साठी मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, घरी येताच पत्नीने केलं असं काही; चाहत्यांनी केलं कौतुक

'कांतारा'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या ऋषभ शेट्टीचे पत्नीने केले अनोख्या पद्धतीने स्वागत. व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल. 

सोनेश्वर पाटील | Updated: Aug 18, 2024, 02:23 PM IST
ऋषभ शेट्टीला 'कांतारा'साठी मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, घरी येताच पत्नीने केलं असं काही; चाहत्यांनी केलं कौतुक title=

70th National Film Award: 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. ज्यामध्ये 'कांतारा'चित्रपटामधील अभिनेता ऋषभ शेट्टीला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला आहे. अभिनेता तसेच त्याचे संपूर्ण कुटुंब आणि चाहत्यांना देखील खूप आनंद झाला आहे. 'कांतारा' हा त्याचा पहिला भारतातील चित्रपट होता आणि त्यासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ऋषभ शेट्टीचा हा आनंद त्याच्या पत्नी आणि मुलांनी एका खास पद्धतीने साजरा केला आहे. सोशल मीडियावर स्वागत करतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 

सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ऋषभ शेट्टी घरी पोहोचला. तेव्हा त्याच्या पत्नीने संपूर्ण घर सजवले होते. हातात आरतीचे ताट धरुन ती आपल्या मुलीसह दारात अभिनेत्याची वाट पाहत होती. ऋषभ शेट्टी घरी येताच त्याने आपल्या मुलीला कुशीत घेतले आणि नंतर पत्नीने औक्षण केले. त्यानंतर ऋषभने पत्नीला मिठी मारली. 

व्हिडीओ व्हायरल 

ऋषभ शेट्टीच्या पत्नीने तिच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.  तिने या व्हिडीओला कॅप्शन दिले आहे की, 'अभिमानाने चंद्रावर! चित्रपटसृष्टीबद्दलच्या त्यांच्या तळमळीला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कठोर परिश्रम, रात्री उशीरा आणि त्यागाचे खरोखर फळ मिळाले आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी देखील भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे. 

एका चाहत्याने म्हटले आहे की,  जो पुरुष आपल्या पत्नी आणि इतर महिलांचा आदर करतो त्याला आयुष्यात यश मिळते. ऋषभ खरोखरच याला पात्र आहे. आणखी एका चाहत्याने लिहिले आहे की, अभिनंदन, हा खरोखर अभिमानाचा क्षण आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

'कांतारा' चित्रपटाने केली 360.33 कोटींची कमाई

2022 मध्ये प्रदर्शित झालेला 'कांतारा' हा चित्रपट मूळ कन्नड भाषेत बनवला गेला होता. त्यानंतर तो हिंदीसह इतर भाषांमध्येही रिलीज झाला होता. केवळ 16 कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने जवळपास 360.33 कोटो रुपयांची कमाई केली होती. आता या चित्रपटाचा सिक्वेल येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील ऋषभ शेट्टीच करणार आहे. त्यासोबतच तो अभिनय देखील करणार आहे.