Salman Khan Next Film: अभिनेता सलमान खानचा 2024 मध्ये एकही चित्रपट आलेला नाही. पण सध्या सलमान खान त्याच्या चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. सुपरस्टार सलमान खान 2025 मध्ये ईदला 'सिंकदर' चित्रपटाद्वारे आतापर्यंतचा सर्वात मोठा धमाका करणार आहे. 'सिंकदर' चित्रपटबद्दल सोशल मीडियावर देखील खूप चर्चा आहे.
चाहत्यांना देखील सलमान खानच्या या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. सलमान खान या चित्रपटावर खूप मेहनत करत आहे. दरम्यान, अशातच आता बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे.
'सिकंदर'नंतर सलमान या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दिसणार
सलमान खान त्याच्या आगामी 'सिंकदर' चित्रपटावर जोमाने काम करत आहे. तर दुसरीकडे सलमान खानने 'किक 2' चित्रपटाची अधिकृत घोषणा केली आहे. साजिद नाडियाडवाला यांनी सोशल मीडिया अकाउंटवर सलमान खानचा एक फोटो शेअर केला आहे. हे फोटो ब्लॅक अँड व्हाईट आहे. त्यासोबतच त्यांनी कॅप्शनमध्ये चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे असं म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, 'किक 2' 'सिंकदर'चे सर्वोत्तम फोटोशूट आहे . साजिद नाडियाडवाला.
'किक 2' ची घोषणा
'किक' चित्रपटानंतर चाहत्यांना सलमान खानच्या या चित्रपटाच्या सिक्वेलची खूप दिवसांपासून उत्सुकता होती. साजिद नाडियाडवाला या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये सलमान खानचा फिटनेस पाहायला मिळत आहे. 2014 मध्ये सलमान खानचा 'किक' चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. हा चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्यांना 100 कोटी रुपये खर्च आला होता.
या चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर 378 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटात सलमानची जबरदस्त अॅक्शन बघायला मिळाली होती. या चित्रपटात सलमान खानसोबत जॅकलीन देखील होती. दोघांची केमिस्ट्री देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. आता 'किक 2' ची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट देखील 500 कोटींची कमाई सहज करेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सलमान खानला पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक झाले आहेत.
सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.
...Read More
LIVE|
NZ
205(75 ov)
|
VS |
WI
24/0(9 ov)
|
| Full Scorecard → | ||
|
INA
(20 ov) 75/9
|
VS |
MAS
78/3(9 ov)
|
| Malaysia beat Indonesia by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
IND
(20 ov) 175/6
|
VS |
SA
74(12.3 ov)
|
| India beat South Africa by 101 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
MAS
(20 ov) 201/9
|
VS |
PHI
87/9(20 ov)
|
| Malaysia beat Philippines by 114 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.