'स्त्री 2' मधील ' अभिनेत्याला लागली लॉटरी, आता सनी देओलसोबत बॉर्डर 2 चित्रपटात झळकणार

सनी देओलच्या 'बॉर्डर 2' संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे. आता या चित्रपटात 'स्त्री 2'मधील एक दमदार अभिनेता दिसणार आहे. कोण आहे तो अभिनेता? जाणून घ्या सविस्तर

सोनेश्वर पाटील | Updated: Aug 18, 2024, 01:36 PM IST
'स्त्री 2' मधील ' अभिनेत्याला लागली लॉटरी, आता सनी देओलसोबत बॉर्डर 2 चित्रपटात झळकणार title=

Border 2 Update: 'गदर 2' नंतर आता अभिनेता सनी देओलच्या 'बॉर्डर 2' बाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आयुष्मान खुराना व्यतिरिक्त, 'स्त्री 2' मधील एक दमदार अभिनेता 'बॉर्डर 2' चित्रपटात सनी देओलसोबत झळकणार आहे. आता या चित्रपटात कोण महत्त्वाची भूमिका साकारणार आहे बघावे लागणार आहे. 

1997 मध्ये सनी देओलच्या 'बॉर्डर' या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात यश मिळाले होते. या देशभक्तीपर चित्रपटात भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध दाखवण्यात आहे आहे. त्यानंतर या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा करण्यात आली होती.  'बॉर्डर 2' मध्ये मुख्य अभिनेता म्हणून सनी देओलचे नाव निश्चित झाले होते. 

सनी देओलसोबत या अभिनेत्याची एन्ट्री

काही दिवसांपूर्वी 'बॉर्डर 2' ची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाबाबत रोज नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. या चित्रपटात अभिनेता सनी देओलसोबत पंजाबी अभिनेता आणि रॉकस्टार दिसणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. त्यानंतर या यादीत अभिनेता आयुष्मान खुरानाचे नाव देखील सामील झाले आहे. मात्र, आता या चित्रपटात अभिनेता वरुण धवन देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. 

 'बॉर्डर 2' मध्ये वरुण धवन

मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता वरुण धवनने नुकताच  'बॉर्डर 2' हा चित्रपट साईन केला आहे. मात्र, अभिनेत्याच्या भूमिकेबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. याशिवाय या चित्रपटातील कोणत्याही अभिनेत्रीचे नाव समोर आलेले नाही. 

'स्त्री 2'मध्ये वरुण धवनने केला कॅमिओ 

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा 'स्त्री 2' 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मोठ्या प्रमाणात या चित्रपटाने दोन दिवसांमध्ये 100 कोटींच्यावर कमाई केली आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता वरुण धवन श्रद्धा कपूरसोबत दिसला आहे. चाहत्यांना या दोघांची जोडी खूपच आवडली आहे. 

'मुंज्या' या चित्रपटामध्ये देखील अभिनेता वरुण धवनने कॅमिओ केला आहे. आता वरुण धवन लवकरच समंथा रुथ प्रभूसोबत 'सिटाडेल: हनी बनी' या मालिकेत दिसणार आहे. जे Amazon Prime वर Stream  केले जाणार आहे.