'त्या' धक्कादायक घटनेनंतर 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीवर घर, गाडी विकण्याची वेळ

घर, गाडी तर विकावीच लागली, त्यानंतर मात्र....  

Updated: Dec 12, 2021, 11:21 AM IST
'त्या' धक्कादायक घटनेनंतर 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीवर घर, गाडी विकण्याची वेळ title=

मुंबई : इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना अभिनेत्रींना अनेक वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो. या संकटांवर मात करत काही अभिनेत्री करियरमध्ये यशस्वी होतात, तर काहींचं करियर मात्र फेल होतं. अशा परिस्थितीचा सामना 'बिग बॉस' फेम अभिनेत्री रुबिना दिलीकने देखील केला. एका मुलाखतीत रुबिनाने तिच्या संघर्षाच्या दिवसांचा उल्लेख केला आहे. रुबीना सांगते की 2011 मध्ये ती एका निर्मात्याकडून तिची फसवणूक  होती. 

निर्मात्याने तिच्यासोबत एक-दोन नव्हे, तर तब्बल 16 लाख रुपयांची फसवणूक केली होती. एवढंच नाही तर या प्रसंगानंतर रुबीनाला घर आणि गाडी विकावी लागली. त्यावेळी रुबिनाचं पेमेंट नऊ महिन्यांसाठी थांबलं होतं. त्याचवेळी रुबीनाने निर्मात्याशी तिच्या पैशांबाबत विचारलं.  या प्रश्नाच्या उत्तरावर तिला मोठा नुकसान सहन करावा लागला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

2011 मध्ये शोच्या निर्मात्यांनी तिच्यावर 16 लाख रुपयांचा दंड ठोठावला आणि तिचं मानधनही दिले नाही. रुबीना पुढे म्हणाली, तिच्यावर असे आरोप लावण्यात आले , ज्यामध्ये काही तथ्य नव्हतं. शूटिंगला दोन तास उशिरा आल्याबद्दल तिच्याकडून 1.45 लाख रुपये घेण्यात आल्याचे अभिनेत्रीने सांगितले. 

अशाप्रकारे रुबीनाचे एकूण 16 लाख रुपयांचे नुकसान झाले. या सर्व घटनेमुळे ती खूप तणावातही आली होती. मात्र, तिने सर्व संकटांवर मात करत नव्या प्रवासाला सुरूवात केली. सध्या रुबिना अनेक प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे.