लग्नानंतर मुंबईतील 'या' आलिशान बंगल्यात राहणार आलिया-रणबीर

रणबीर कपूर व्यतिरिक्त आलिया भट्ट नीतू कपूर आणि रिद्धिमा कपूरसोबत पार्टी करताना आणि क्वॉलिटी टाईम घालताना दिसते. 

Updated: Sep 25, 2021, 03:59 PM IST
लग्नानंतर मुंबईतील 'या' आलिशान बंगल्यात राहणार आलिया-रणबीर

मुंबई : नुकतच डार्लिंग चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर आलिया भट्ट तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक कामे पूर्ण करण्यात व्यस्त आहे. रणबीर कपूर व्यतिरिक्त आलिया भट्ट नीतू कपूर आणि रिद्धिमा कपूरसोबत पार्टी करताना आणि क्वॉलिटी टाईम घालताना दिसते. आलिया कपूर फॅमिलीच्या लंचमध्येही अनेकदा सहभागी होते. त्याचवेळी, ती नीतू कपूर आणि रणबीर कपूरसोबत रणबीरच्या नवीन घराच्या बांधकाम साईटवर सुद्धा दिसली. यादरम्यान ती जीम वेअरमध्ये दिसली. या लूकमध्ये आलिया भट्ट खूप स्मार्ट आणि सुंदर दिसत होती. आलिया भट्ट देखील रणबीर कपूरच्या घराचं काम पाहण्यासाठी पोहोचली होती.

साईटवर पोहोचल्यानंतर आलियाने संपूर्ण घराची पाहणी केली आणि तेथे उपस्थित असलेल्या लोकांशीही चर्चा केली. ती बहुधा सर्व खोल्या आणि संपूर्ण घर जवळून बघत होती. यानंतर, ती देखील वरच्या मजल्यावर गेली आणि घरातील काम कशाप्रकारे सुरु आहे त्याची पाहणाी केली.

रणबीर कपूर त्याच्या पुढील चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असताना, आलिया भट्ट त्याच्या अनुपस्थितीत बांधल्या जाणाऱ्या घरावर बारीक नजर ठेवून आहे. लग्नानंतर असे मानले जाते की आलिया आणि रणबीर कपूर या घरात राहतील.