अहान शेट्टी आणि त्याच्या गर्लफ्रेंडमधील इतकी जवळीक पाहता, अशी होती सुनील शेट्टीची रिअ‍ॅक्शन

तान्याने तिच्या इंस्टाग्रामवर 'तडप'च्या शूटिंगदरम्यानचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

Updated: Dec 8, 2021, 01:36 PM IST
अहान शेट्टी आणि त्याच्या गर्लफ्रेंडमधील इतकी जवळीक पाहता, अशी होती सुनील शेट्टीची रिअ‍ॅक्शन

मुंबई : अहान शेट्टी सध्या त्याच्या 'तडप' चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. त्याचा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. अभिनेता अलीकडेच त्याची गर्लफ्रेंड तान्या श्रॉफसोबत लंच डेटवर दिसला होता. दोघेही अनेकदा एकमेकांसोबतचे सोशल मीडियावरती फोटो शेअर करत असतात. अलीकडेच अहानची गर्लफ्रेंड तान्याने तिचे आणि अहानचे काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. ज्याची सोशल मीडियावर जोरदार टिका होत आहे.

तान्याने तिच्या इंस्टाग्रामवर 'तडप'च्या शूटिंगदरम्यानचे अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती अहानच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. दोघांमध्ये खुप सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

हे फोटो शेअर करत तान्याने कॅप्शनमुध्ये लिहिले की, "तु किती मेहनत घेतली आहे हे कोणालाच कळणार नाही. पण मी भाग्यवान आहे की, हे सगळं करताना मी तुला पाहिले. तु सर्वांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेस, तु स्वतःशी खरा राहा. तु तुझ्या कामात दाखवलेली तळमळ मला प्रेरणा देते. तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या लोकांवर प्रेम करता आणि त्यांचे संरक्षण करता ते खूप प्रभावी आहे. मी शेवटपर्यंत तुझ्यावर प्रेम करीन आणि प्रत्येक अडचणीत तुझ्या पाठीशी उभी राहीन. तू कधीही बदलू नकोस."

तान्याच्या पोस्टवर कमेंट करताना अहानने लिहिले की, 'I Love You', तसेच या फोटोवर अथिया शेट्टी आणि तिचा प्रियकर केएल राहुल यांनी रेड हार्ट इमोजी शेअर केला आहे. तर वडिल सुनिल शेट्टीने यावर काळ्या रंगाचा हार्ट पाठवला आहे. चाहत्यांनीही या जोडप्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

अहान आणि तान्या जवळपास 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. ते अनेकदा एकमेकांसाठी रोमँटिक पोस्ट करत असतात.

सुनीलने 'टडप'च्या रिलीजवर मुलगा अहानला शुभेच्छा दिल्या आणि सल्ला दिला आणि लिहिले, "जर तुम्ही प्रामाणिक असाल, लोक तुमच्यावर टीका करत असतील तर ते मनावर घेऊ नका आणि धडा म्हणून घ्या. स्तुतीच्या नशेत असताना कधीही बढाई मारू नका. ही एक उपलब्धी आहे. नेहमी जमिनीवर रहा. प्रामाणिक आणि सत्यवादी व्हा. तुमचे मित्र कोण बनतील हे तुमचे अनुयायी महत्त्वाचे आहेत. लोक तुमच्यावर प्रेम करतात मी तुझ्यावर प्रेम करतो बेटा."