'जेठालाल'कडे मुलीच्या लग्नाची लगबग; पाहा कोण आहे होणारा जावई

जेठालाल यांची लेक एकाएकी का आलीये चर्चेत? 

Updated: Dec 10, 2021, 04:52 PM IST
'जेठालाल'कडे मुलीच्या लग्नाची लगबग; पाहा कोण आहे होणारा जावई
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेनं प्रेक्षकांच्या मनावर मागच्या अनेक वर्षांपासून राज्य केलं आहे. आताही ही मालिका त्याचं कथानक आणि सहभागी कलाकारांमुळे गाजते. मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचं प्रेमही मिळतं. त्यातही विशेष प्रेम मिळतं ते म्हणजे अभिनेता दिलीप जोशी, अर्थात सर्वांचेच लाडके जेठालाल यांना. 

जेठालाल सध्या त्यांच्या मुलीमुळं चर्चेत आले आहेत. आता तुम्ही म्हणाल मालिकेत तर, जेठालाल यांना कोण मुलगी नाही. 

तर, इथं प्रकरण जरा वेगळं आहे. ही दिलीप जोशी यांनी खऱ्या आयुष्यातील मुलगी आहे, जिचं लग्न मुंबईतील एका अतिशय आलिशान ठिकाणी पार पडणार आहे. 

दिलीप जोशी त्यांच्या मुलीच्या लग्नात कोणत्याही व्यवस्थेमध्ये ढिसाळपणा पाहू इच्छित नाहीत. ज्यासाठी त्यांनी लग्नाचं आयोजन मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये केलं आहे. 

टेलिव्हिजन विश्वापासून अनेक मान्यवरांची या विवाहसोहळ्याला उपस्थिती असणार आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार ताज हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराला या लग्नाचं आमंत्रण असणार आहे. 

दिलीप जोशी यांच्या जावयाचं नाव समोर आलं नसलं, तरीही सध्या समोर आलेल्या माहितीनुसार एका एनआरआयशी त्यांची मुलगी लग्न करणार आहे.