मुंबई : बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर यांच्यानंतर आणखी एका कलाकारावर लैंगिक अत्याचाराचा आरोप लावण्यात आला आहे. कॉमेडी ग्रुप AIB मधील स्टँडअप कॉमेडिअन उत्सव चक्रवर्तीवर अनेक महिलांनी लैंगिक अत्याचाराचा आरोप लावण्यात आला आहे. याचा खुलासा महिलांनी ट्विटरवर केला आहे. या महिलेने ट्विटमध्ये सांगितलं की, ऑस्ट्रेलियातील क्रूझवर उत्सव चक्रवर्तीने त्या महिलेसोबतच अनेक अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप लावला आहे.
तसेच या महिलेचा आरोप आहे की उत्सवने तिच्यासहीत सर्व मुलींना आपत्तिजनक फोटो शेअर करायला सांगितले. या ट्विटनंतर अनेक महिलांनी उत्सव चक्रवर्तीविरोधात ट्विट करणारे आरोप केले होते.
I want everyone to know @Wootsaw is a piece of shit. He sent me a dick pic, was creepy, then cried saying I’ll ruin his career if I tell others. I told two of the most influential men in comedy in India. Nothing happened. Let me tell you what else he has done with others.
— Mahima Kukreja (@AGirlOfHerWords) October 4, 2018
या प्रकरणात पोलिसांच असं म्हणणं आहे की, पीडित महिलेच्या ट्वीटनंतर याचा तपास केला. या महिलांच्या खुलासानंतर अदिती मित्तल आणि वरूण ग्रोवर सारख्या कॉमेडिअन महिला धावून आल्या. तर उत्सवने देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सर्व आरोप खोटे असल्याचं सांगितलं आहे. त्याने म्हटलं आहे की, मला कळत नाही माझ्याबद्दल लोकं असं का बोलतात. मी कुणावर काहीच आरोप करत नाही पण हे सर्व प्रकरण खूप गुंतागुंतीचं आहे.