Aishwarya Rai: ऐश्वर्याने खरंच झाडाशी केलेलं पहिलं लग्न? जेव्हा अभिनेत्रीसह बिग बींना विचारण्यात आला प्रश्न…

Aishwarya Rai Wedding: ऐश्वर्या आणि अभिषेक या दोघांची भेट गुरुच्या सेटवर झाली आणि तिथूनच त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली. या दोघांचाही हा एक खाजगी विवाह सोहळा होता. 

सुरभि जगदीश | Updated: Nov 1, 2023, 11:51 AM IST
Aishwarya Rai: ऐश्वर्याने खरंच झाडाशी केलेलं पहिलं लग्न? जेव्हा अभिनेत्रीसह बिग बींना विचारण्यात आला प्रश्न… title=

Aishwarya Rai Wedding: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचा आज 50 वाढदिवस आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांनी 2007 मध्ये एकमेकांशी लग्न केलं होतं. ऐश्वर्या आणि अभिषेक या दोघांची भेट गुरुच्या सेटवर झाली आणि तिथूनच त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली. या दोघांचाही हा एक खाजगी विवाह सोहळा होता. मात्र ऐश्वार्याच्या लग्नाच्या वेळी अनेक अफवा पसरल्याचं दिसून आलं. यावेळी सोशल मीडियावर अनेक गोष्टीही बोलल्या जात होत्या. या सर्व अफवांमध्ये, एक अफवा अशी होती की, मांगलिक दोष दूर करण्यासाठी, ऐश्वर्याला अभिषेकसोबत सात फेरे घेण्यापूर्वी एका झाडाशी लग्न करावं लागलं होतं. दरम्यान या अफवेवर अखेरीस ऐश्वार्यालाच मौन सोडावं लागलं होतं. 

स्वप्नातंही अशा अफवांचा विचार केला नव्हता

ऐश्वार्याने मांगलिक दोष दूर करण्यासाठी झाडाशी लग्न केल्याची अफवा इतकी पसरली होती की, अखेरीस यावर ऐश्वार्याने वक्तव्य केलं. 2008 साली एका इंटरव्ह्यूमध्ये या अफवेवर नाराजी व्यक्त करत ऐश्वार्या म्हणाली होती की, काही गोष्टी अपेक्षित होत्या, पण काही गोष्टींचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. अशावेळी काही घटना होत्या, पण त्यांच्याबद्दल बोलून त्यांना जास्त अटेंशन द्यायचं नाही. 

झाडाशी लग्न करण्याच्या अफवेबाबत ऐश्वर्या म्हणाली की, “हो, हे घडलं, पण मला ही अफवा इतकी बेकार वाटली की, मी यावर उत्तर देणं गरजेचं मानलं नाही. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आमचं कुटुंब इतकं पक्कं आहे की, आम्ही सर्व काही कुटुंबाच्या प्रमुखांवर सोडल्या. पापा (अमिताभ बच्चन) लग्नानंतर योग्य वेळी मीडियाला भेटले आणि नंतर सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.

परदेशी मीडियाने विचारला होता प्रश्न

केवळ भारतातील मीडिया नव्हे तर परदेशी मीडियाकडूनही ऐश्वार्याला याबाबत विचारण्यात आलं होतं. ऐश्वार्याच्या म्हणण्यानुसार, "तुम्ही परदेशात फिरता तेव्हा अनेक वेळा आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर यावं लागतं. त्यावेळी मला विचारलं गेलं की, 'तू झाडाशी लग्न केलेस का? तुला मोठा शाप मिळाला आहे का?’ मग आपण विचार करायला लागतो की, अरे देवा, मी कुठून सुरुवात करू’"

अमिताभ बच्चन यांनी दिलं होतं स्पष्टीकरण

दरम्यान या गोष्टींची बच्चन कुटुंबीयांनी वारंवार फेटाळली केली. 2007 मध्ये अमिताभ बच्चन यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितल होत की, कुटुंब अंधश्रद्धाळू नाही. ऐश्वर्याची कुंडलीही पाहिली नव्हती. ते झाड कुठे आहे?' कृपया ते मला दाखवा. तिने फक्त माझ्या मुलाशी लग्न केलंय.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x