अनमोल-क्रिशा अंबानीच्या लग्नात Aishwarya Rai Bachchan ची होतेय चर्चा, फोटो व्हायरल

अंबानी कुटुंबात नुकतंच लग्न समारंभ पार पडला. जेथे अनेक मोठ-मोठ्या लोकांनी हजेरी लावली, अगदी बॉलिवूड स्टार्सपासून ते पॉलिटिकल लोकांपासून सगळेच लोक लग्नात होते.

Updated: Feb 23, 2022, 07:31 PM IST
अनमोल-क्रिशा अंबानीच्या लग्नात Aishwarya Rai Bachchan ची होतेय चर्चा, फोटो व्हायरल title=

मुंबई : अंबानी कुटुंबात नुकतंच लग्न समारंभ पार पडला. जेथे अनेक मोठ-मोठ्या लोकांनी हजेरी लावली, अगदी बॉलिवूड स्टार्सपासून ते पॉलिटिकल लोकांपासून सगळेच लोक लग्नात होते. यासमारंभाचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामुळे लोकांमध्ये देखील एकच चर्चा रंगली. खरेतर रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांचा मुलगा अनमोल अंबानी नुकताच विवाहबंधनात अडकला.

अनमोलने आपली गर्लफ्रेंड क्रिशा शाहसोबत सात फेऱ्या घेतल्या आणि संपूर्ण आयुष्य एकत्र घालवण्याचा निर्णय घेतला. अनमोल आणि क्रिशाच्या लग्नाशी संबंधित अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यात अंबानी कुटुंबात संपूर्ण बच्चन कुटुंबाने उपस्थीती लावली.

ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन ही या लग्नाला उपस्थित होते. या घटनेचे फोटो समोर आले आहे. या फोटोत ऐश्वर्या आणि मुलगी आराध्या एक सारख्याच कपड्यात दिसले. ऐश्वर्याने सुंदर लाल रंगाचा लेहेंगा घातला आहे, तर आराध्याने लाल रंगाचा ड्रेस घातला आहे.

ऐश्वार्याने आपल्या सैंदर्याने आणि अभिनयाने सर्वांनाच वेड लावलं आहे. त्यात आता तिने या लाल रंगाच्या लेहेंग्यात देखील सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे.

खरेतर क्रिशाने देखील लग्नात लाल आणि गोल्डन रंगाचा ड्रेस लेहेंगा घातला आहे. परंतु ऐश्वर्याच्या सौंदर्यापुढे मात्र कोणीही टिकू शकत नाही. हे ऐश्वर्याच्या या फोटोंमुळे पुन्हा सिद्ध झाले आहे.

टीना अंबानी यांचा मुलगा अनमोल अंबानीच्या लग्नात हेमा मालिनीही पोहोचल्या होत्या. एवढेच काय तर सुप्रिया सुळे देखील या लग्नात उपस्थित होते. या सगळ्यांनी देखील एकत्र फोटो काढले आहेत.

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) देखील फारच सुंदर दिसत होते. त्यांनी लग्नात ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी घातली आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x