कॉलेजच्या इंग्लिश प्रोफेसरमुळे ऐश्वर्या राय बनलं मोठं नाव कसं? ते जाणून घ्या

  ऐश्वर्या रायने आपल्या अभिनयाने संपूर्ण जगात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Updated: Nov 25, 2021, 02:14 PM IST
 कॉलेजच्या इंग्लिश प्रोफेसरमुळे ऐश्वर्या राय बनलं मोठं नाव कसं? ते जाणून घ्या title=

मुंबई : ऐश्वर्या राय बच्चन हे एक नाव, एक ओळख, एक असं व्यक्तिमत्व आहे. जिने आपल्या अभिनयाने संपूर्ण जगात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आज ऐश्वर्या बॉलिवूडच्या सर्वात प्रसिद्ध कुटुंबाची म्हणजेच बच्चन कुटुंबाची सून आहे. या क्षणी ती आपला सगळा वेळ कुटुंबासाठी देते. चित्रपटांपासून दूर राहूनही तिला प्रसिद्धीच्या झोतात येण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. 

 ऐश्वर्याने मिस वर्ल्ड ते स्वतःच्या बळावर एक उत्तम अभिनेत्री बनण्याचा प्रवास केला आहे. पण एका फोटोशूटसाठी तिच्या कॉलेजचे प्रोफेसर तिच्याकडे आले नसते तर तिचा हा प्रवास सुरू झालाच नसता असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. खरं तर, खूप वर्षांपूर्वी ऐश्वर्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, जेव्हा ती कॉलेजचं शिक्षण पूर्ण करत होती, तेव्हा तिच्या इंग्रजीच्या प्राध्यापकाने तिला तिच्या काही महत्त्वाच्या प्रोजेक्ट्ससाठी फोटोशूट करायला सांगितलं होतं.
 

यानंतर ऐश्वर्याचं काम चांगलंच गाजलं. प्राध्यापकांनी तिला याबद्दल खूप काही शिकवलंही. आणि मग तिची मॉडेलिंगची आवड जागृत झाली.या मुलाखतीत ऐश्वर्याने सांगितलं होतं की, ती मिस वर्ल्ड झाल्यानंतर लोकं तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ लागले. तिला कामही मिळू लागलं. जुन्या मुलाखतीतली ऐश्वर्या आणि आजची ऐश्वर्याकडे बघितल्यावर तर सहजच तिच्या चेहऱ्यात बदल दिसू शकतो. पण तिचा आत्मविश्वास आजही कायम आहे. कदाचित त्यामुळेच ती लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करते.