Aishwarya Rai Bachchan Winks at Paris Fashion Week: ऐश्वर्या राय बच्चन हिच्या सौंदर्यांची सर्वत्र चर्चा रंगलेली असते. त्यातून अनेक मोठ्या ब्रॅण्ड्सचा ती चेहराही आहे. आंतरराष्ट्रीय फॅशन महोत्सवातही तिची जोरात चर्चा असते. त्यातून बड्या फॅशन शोमध्येही ती झळकताना दिसते. यावेळीही तिनं पॅरिस फॅशन वीकमध्ये हजेरी लावली होती. त्यामुळे तिची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. यावेळी तिनं सुंदर असा ग्लोडन शिमरचा गाऊन घातला होता. तिच्यासोबत या रॅम्पवर बड्या अभिनेत्री आणि फॅशननिस्टाही होत्या.
त्यांच्यासोबत तिनं हा रॅम्पवॉक केला. ऐश्वर्या राय बच्चन आता 50 वर्षांची झाली आहे. त्यातून आजही ती तितकीच सुंदर आणि फिट आहे. तिच्या अभिनयाचेही सर्वचजण फॅन्स आहेत. त्यातून तिच्या सौंदर्यावरही सगळेच जणं फिदा आहेत. यावेळी तिचा पॅरिस फॅशन वीकमधला जलवा पाहून सगळेच घायाळ झाले आहेत. यावरून हे स्पष्ट समजते की कशाप्रकारे आजही ऐश्वर्या राय बच्चन ही आपल्या चाहत्यांना घायाळ करून सोडते आहे.
ऐश्वर्या राय बच्चन ही नुकतीच आपल्या लेकीसोबत एअरपोर्टवर स्पॉट झाली होती. ती आराध्यासोबत फ्रान्सचा प्रवास करत होती. मुंबई एअरपोर्टवरून ती रवाना झाली होती. तिचा हा व्हिडीओ सध्या ट्विटरवर चांगला व्हायरल होतो आहे. काहींना म्हटलं आहे की, ''गेल्या वीस वर्षात ऐश्वर्याचा हा ऑरा अजिबातच बदललेला नाही.'' त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये फक्त तिचीच चर्चा होती. तिचा आऊटफिट पाहून एकानं कमेंट केली आहे की, ''ही कोण आहे सोनेरी जलपरी''. तर तिसऱ्या कमेंट केलीये की ''चोवीस कॅरेट सोनंच''. सध्या तिच्या या व्हिडीओखाली नेटकरी नानाविध कमेंट्स करताना दिसत आहेत. यावेळी तिचा हा गोल्डन लुक पाहूनच चाहते पुरते वेडे झाले आहेत. यावेळी तिची चर्चा जोरात पाहायला मिळाली होती.
हेही वाचा : ट्रोलर्सबद्दल हृतिकच्या प्रेयसीची प्रामाणिक कबुली! म्हणाली, 'लोकांकडून मिळणारा द्वेष...'
यावेळी ऐश्वर्यासोबत कॅन्डल जेनर, इवा लॉन्गोरिया, कॅमिला कॅबेलो, एले फनिंगही दिसल्या होत्या. पहिल्यांदा ती एकटी रॅम्पवॉक करत होती. नंतर तिनं सगळ्यांसोबत रॅम्प वॉक केला. यावेळी तिची अदाकारी पाहून चाहते प्रचंड फिदा झाले. कुठेतरी स्वर्गात अप्सराच यावी असा तिचा रॅम्पवॉक होता. त्यामुळे तिचा हा व्हिडीओ इंटरनेटवर तूफान व्हायरल होतो आहे. यावेळी चर्चा आहे ती म्हणजे तिच्या आऊटफिटची. तिनं केपचा गाऊन घातला होता. सोबतच मॅचिंग कानातले होते. यावेळी तिनं रॅम्पवॉक करताना मस्तपैंकी स्टाईलमध्ये डोळे मिचकावले आणि फ्लाईंग किस दिली.