Aishwarya Rai Trolled : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही विश्व सुंदरी आहे. ऐश्वर्या अनेक कार्यक्रमांमुळे चर्चेत राहते. नुकतीच ऐश्वर्या ही नुकतीच लॉरिअल पॅरिस फॅशन वीकमध्ये दिसली होती. यावेळी तिचा एक वेगळाच लूक प्रेक्षकांना पाहायला मिळला. तिचा हा लूक पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. त्याचं कारण म्हणजे तिचं वाढलेलं वजन आहे. अनेक नेटकर्यांनी ऐश्वर्याला बॉडी शेमिंग करत ट्रोल केलं आहे. त्यावर ऐश्वर्यानं आता प्रतिक्रिया दिली आहे.
ऐश्वर्यानं काही दिवसांपूर्वी त्या एका कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली होती. त्या कार्यक्रमात ऐश्वर्यानं ऑल ब्लॅक असा लूक केला होता. ऐश्वर्याच्या हटके स्टाईलपासून तिची हटके एन्ट्री सगळ्या गोष्टी या चर्चेत होत्या. मात्र, तिचा हा लूक काही नेटकऱ्यांना आवडला नाही आणि त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्यावरून आता ऐश्वर्याला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आलं असता तिनं ट्रोलर्सना खडे बोल सुनावले आहे. 'मी कशाप्रकारचे कपडे परिधान करावेत हे सांगणारे तुम्ही कोण, माझे आयुष्य मला हवे तसे जगण्याचा अधिकार नाही का, ही गोष्ट तुम्ही कधी लक्षात घेणार' असा प्रश्नही ऐश्वर्यानं ट्रोल करणाऱ्यांना केला आहे.
ऐश्वर्याच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती सगळ्यात शेवटी पोनियन सेल्वनमध्ये दिसली होती. या चित्रपटात तिचा एक वेगळाच लूक पाहायला मिळाला होता. त्यानंतर ऐश्वर्या कुठे गेली असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर आता ऐश्वर्याकडे आणखी कोणते प्रोजेक्ट आहेत असा प्रश्न पडला असेल तर त्याविषयी तिनं अजून काहीही माहिती दिली नाही. पण तिच्या आगामी चित्रपटाविषयी जाणून घेण्याची त्यांच्या चाहत्यांना इच्छा आहे.
ऐश्वर्या चर्चेत असण्याचं कारण अनेकदा तिची लेक आराध्या ठरते. तिला आराध्यामुळे अनेकदा ट्रोल करण्यात येत. आराध्याचा हेअर कट आणि तिच्याविषयी ऐश्वर्या किती प्रोटेक्टिव्ह आहे यावरून ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते.
हेही वाचा : 'तुम्ही कोण ठरवणारे?', इंग्रजीवरून ट्रोल करणाऱ्यांना सईनं उलटसुलट फटकारलं
दरम्यान, ऐश्वर्या नुकतीच लॉरिअल पॅरिस फॅशन वीकमध्ये दिसली होती. त्यावेळी तिच्यासोबत आपल्या सगळ्यांना नव्या नवेली नंदा देखील दिसली. बच्चन कुटुंबातील दोन लोकांना या कार्यक्रमात पाहिल्यानंतर अनेकांना आनंद झाला होता.
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| England beat Australia by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.