प्रसिद्ध अभिनेत्यासोबत ऐश्वर्या रायचा किसिंग सीन व्हायरल होताच...

चित्रपटासाठी अभिनेत्यासोबत ऐश्वर्या रायचा किसिंग सीन, असं काय घडलं की उडाला एकचं गोंधळ  

Updated: Nov 24, 2021, 02:58 PM IST
प्रसिद्ध अभिनेत्यासोबत ऐश्वर्या रायचा किसिंग सीन व्हायरल होताच... title=

मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आज अभिनयापासून दूर असली तरी तिच्याबद्दल सतत चर्चा रंगलेल्या असतात.  मग त्या रंगणाऱ्या चर्चांमागे  कारण काहीही असो.. सध्या ऐश्वर्या राय चर्चेत आली आहे ती म्हणजे 2006 साली प्रदर्शित झालेल्या 'धूम 2' चित्रपटामुळे. चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता हृतिक रोशनने स्क्रिन शेअर केली. चित्रपटातील दोघांचा लुक्स, डान्स, रोमान्स इत्यादी गोष्टींमुळे चित्रपट तुफान चर्चेत होता. आज 'धूम 2' चित्रपटला 15 वर्ष पूर्ण झाली आहेत. 

पण सर्वात जास्त चर्चा रंगली ती म्हणजे ऐश्वर्या आणि हृतिकच्या किसिंग सीनबद्दल. चित्रपटातील किसिंग सीन बद्दल ऐश्वर्याने एका मुलाखातीत उघडपणे सांगितलं. ऐश्वर्या म्हणाली, 'प्रेक्षकांना देखील मला ऑनस्क्रिन किसिंग सिन करताना पाहाणं सोपं वाटलं नसेल. पण तरी देखील मी सीन करण्यासाठी तयार झाली.'  

किसिंग सीननंतर तिला अनेक धमक्यांना सामोरं देखील जावं लागलं. त्यामुळे सर्वत्र एकचं गोंधळ उडाला होता. तेव्हा ऐश्वर्याने दिलेला किसिंग सीन प्रेक्षकांना आवडला नव्हता. 'धूम 2' नंतर ऐश्वर्याने 'गुरू', 'जोधा अकबर', 'सरकार राज', 'द पिंक पँथर 2', 'रावण', 'ऍक्शन रिप्ले', 'गुजारिश', 'जज्बा', 'सरबजीत', 'ऐ दिल है मुश्किल' यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील तिने काम केलं आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x