धक्कादायक : ''मानसिक आणि शारिरीक शोषण केलं'' म्हणत ऐश्वर्याने सलमानबाबत केलं मोठं वक्तव्य

जेवढी चर्चा त्यांच्या अफेअर्सची झाली होती तेवढीच चर्चा त्यांच्या ब्रेकअपचही झाली होती. सलमान आणि ऐश्वर्याचे ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्याने तिचा सगळा राग सलमानवर काढला होता.

Updated: Mar 26, 2023, 08:40 PM IST
धक्कादायक : ''मानसिक आणि शारिरीक शोषण केलं'' म्हणत ऐश्वर्याने सलमानबाबत केलं मोठं वक्तव्य

मुंबई : एकेकाळी ऐश्वर्या आणि सलमान खान  (Salman Khan) ही जोडी त्यांच्या पर्सनल आयुष्यामुळे खूप चर्चेत होती. सलमान आणि ऐश्वर्या  (Aishwarya Rai) च्या नात्याबद्दल ज्याला माहिती नसेल असं कोणीतरी क्वचितच सापडेल. या दोघांची लव्हस्टोरी संजय लीला भन्साळी यांच्या 'हम दिल दे चुके सनम' (Hum Dil De Chuke Sanam)च्या सेटवर सुरु झाली. या दोघांचे चाहते त्यांच्या अफेअरमुळे खूप चर्चेत होते. 

जेवढी पसंती या जोडीला ऑनस्क्रिन मिळाली तेवढीच पसंती या जोडीला ऑफस्क्रिन मिळाली. या जोडीला खूप पसंती मिळाली होती. एवढंच नव्हतर जेवढी चर्चा त्यांच्या अफेअर्सची झाली होती तेवढीच चर्चा त्यांच्या ब्रेकअपचही झाली होती. सलमान आणि ऐश्वर्याचे ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्याने तिचा सगळा राग सलमानवर काढला होता तिने त्याच्यावर आरोपही केले होते. जाणून घेवूया ऐश्वर्याचं वक्तव्य ...

2001 मध्ये सलमान आणि ऐश्वर्याचं ब्रेकअप झालं होतं. 2002 पर्यंत त्यांच्या ब्रेअपच्या बातम्या बाहेर येऊ लागल्या होत्या. मात्र या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याच्या एका वक्तव्याने जबरदस्त खळबळ उडाली होती. ब्रेकअपनंतर ऐश्वर्याने सलमानवर आरोप करत म्हटलं होतं की, ''सलमानने माझं मानसिक आणि शारिरीक शोषण केलं आहे आणि माझ्या शांत बसण्याचा चुकीचा फायदा उचलला. अफवा उठवल्या. मी प्रत्येक क्षणात त्याला साथ दिली आहे. मात्र त्याबदल्यात मला त्याने त्रास आणि दुख:च दिलं आहे.''
 
रागात ऐश्वर्याने केले मोठं वक्तव्य
एवढंच नव्हेतर मीडिया रिपोर्टनुसार  ऐश्वर्या रायने ब्रेकअपनंतर वक्तव्य करत म्हटलं की, ''यापुढे मी कधीच सलमान खानसोबत काम करणार नाही, सलमान खानचा चॅप्टर तिच्या आयुष्यातला एक वाईट स्वप्नासारखा होता. आणि यासाठी मी देवाचे  मनापासून आभार मानते की, तो चॅप्टर आता माझ्या आयुष्यातून संपला आहे. ऐश्वर्याने हे सुद्धा म्हटलं की, सलमानने तिचं काम आणि तिचे  को-स्टार्ससोबत त्यांच्या नात्याला खराब करण्याचा प्रयत्न केला''

यानंतर ऐश्वर्या राय गुरु सिनेमाचं शूटींग करत असताना तिच्यात आणि अभिषेक बच्चनमध्ये जवळिकता वाढू लागली. आणि या दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.  या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणि 20 एप्रिल 2007 मध्ये या कपलने लग्नगाठ बांधली. या दोघांना आराध्या नावाची गोड मुलगी आहे तर दुसरीकडे सलमान आजही अविवाहीत आहे.