अजय देवगणच्या 'तान्हाजी'ची लयभारी कमाई, ३०० कोटींकडे वाटचाल

 अजय देवगणचा 'तान्हाजी' सिनेमा बॉक्स ऑफिसवर बक्कल कमाई करताना दिसत आहे.  

Updated: Feb 13, 2020, 05:55 PM IST
अजय देवगणच्या 'तान्हाजी'ची लयभारी कमाई, ३०० कोटींकडे वाटचाल title=

मुंबई : प्रेक्षकांनी अजय देवगणच्या 'तान्हाजी' सिनेमाला डोक्यावर घेतली आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर बक्कल कमाई करताना दिसत आहे. आतापर्यंत या सिनेमाच्या कमाईचे आकडे वाढता वाढता वाढतच आहेत. आतातर सिनेमा ३०० कोटींच्या घरात पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पाचव्या आठवड्यातही 'तान्हाजी'ची कमाई २६९.२५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा चित्रपट 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर'ची पाचव्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वीर सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर हा सिनेमा आधारित आहे. अभिनेता अजय देवगण, अजची पत्नी काजोल, सैफ अली खान, शरद केळकर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमा लोकांच्या पसंतीला उतरल्याने आजही बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची जादू कायम असल्याचे कमाईतील आकडेवारीवरुन दिसून येत आहे.

या सिनेमाची सुरुवातही दमदार झाली. दुसऱ्या आठवड्यात सिनेमाने ४७.२५ कोटी रुपयांची कमाई केली होती. आठवडाभरात 'तान्हाजी'ची ११६ कोटी रुपयांची कमाई करणारा या वर्षातील पहिला सिनेमा ठरला.  हा चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल पाच आठवडे उलटले तरी या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
 
पहिल्या शुक्रवारी 'तान्हाजी' सिनेमाने १.१५ कोटी रुपयांची कमाई केली तर शनिवारी २.७८ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. रविवारी या सिनेमाने ३.४५ कोटींची कमाई केली होती. हा कमाईचा आकडा असाच वाढत राहिला तर हा सिनेमा लवकरच ३०० कोटींचा टप्पा पार करेल, असे चित्रपट समीक्षकांकडून ऐकायला मिळत आहे.