बादशाहो: 'मेरे रश्के कमर' गाण्यात रोमान्स करताना दिसणार अजय देवगण आणि इलियाना

बॉलिवूड स्टार अजय देवगण आणि इलियाना डीक्रूज यांचा आगामी चित्रपट बादशाहोचे पहिले गाणे रिलीज झाले आहे. हे गाणे काही दिवसांपूर्वी फेमस झालेल्या 'मेर रश्के कमर' या गाण्याचा रिमेक आहे. हे गाणे पाकिस्तानी गायक राहत फतह अली खान यांच्या आवाजात आहे. 

Updated: Jul 14, 2017, 03:26 PM IST
बादशाहो: 'मेरे रश्के कमर' गाण्यात रोमान्स करताना दिसणार अजय देवगण आणि इलियाना  title=

मुंबई : बॉलिवूड स्टार अजय देवगण आणि इलियाना डीक्रूज यांचा आगामी चित्रपट बादशाहोचे पहिले गाणे रिलीज झाले आहे. हे गाणे काही दिवसांपूर्वी फेमस झालेल्या 'मेर रश्के कमर' या गाण्याचा रिमेक आहे. हे गाणे पाकिस्तानी गायक राहत फतह अली खान यांच्या आवाजात आहे. 

हे गाणे अजय आणि एलियानावर चित्रित झाले आहे. यात दोघांची लव्ह केमिस्ट्री दिसत आहे. या गाण्यात इलियाना एका राणीप्रमाणे दिसत आहे. त्यानंतर इलियाना वेस्टर्न आऊटफीटमध्ये दिसत असून अजयसोबत रोमान्स करताना दिसत आहे. 

 

नुसरत फतेह अली खान यांनी ही कव्वाली ४० वर्षांपूर्वी म्हटले होती. त्यानंतर यूट्यूबवर वेगवेगळ्या अंदाजात त्याला रिक्रेट करण्यात आले. 

या चित्रपटात अजय आणि इलियानासोबत विद्युत जामवाल, इमरान हाश्मी, ईशा गुप्ता पण दिसणार आहेत. बादशाहो येत्या १ सप्टेंबरला रिलीज होणार आहे.