काजोलची लेक प्रेमात? अजयला समजलं तर तो... अभिनेत्रीला भीती 

 न्यासा देवगन लहानपणापासूनच तिच्या आई-वडिलांची लाडकी आहे.

Updated: Apr 28, 2022, 02:25 PM IST
काजोलची लेक प्रेमात? अजयला समजलं तर तो... अभिनेत्रीला भीती  title=

मुंबई : न्यासा देवगन लहानपणापासूनच तिच्या आई-वडिलांची लाडकी आहे. काजोल आणि अजय देवगणने आपल्या मुलीला लाडाने वाढवलं ​​आहे. न्यासाच्या चेहऱ्यावरचा आनंद अजय देवगण आणि काजोलचा दिवस बनवतो. त्याचं आपल्या मुलीवर अपार प्रेम आहे. बॉलीवूडमध्ये सिंघम म्हणून प्रसिद्ध असलेला अजय देवगण आपल्या मुलीवर बिनशर्त प्रेम करतो. पण सध्या चर्चा आहे ती न्यासा देवगनची. न्यासा सध्या प्रेेमात असल्याची जोरदार चर्चा सुरुये. आता तो कोण आहे हे अद्याप समजलेलं नाही. मात्र एका मुलाखतीत तिच्या आईने एक वक्तव्य केलं होतं.

 आजकाल, काजोलच्या जुन्या मुलाखतीची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती मुलगी न्यासाच्या बॉयफ्रेंडबद्दल बोलताना दिसत आहे.

 फीट अप विथ द स्टार्समध्ये पोहोचलेल्या काजोलला जेव्हा विचारण्यात आलं की, जर तुम्ही न्यासाला सिक्रेट बॉयफ्रेंडसोबत पकडलं तर तुमची प्रतिक्रिया काय असेल. अशा परिस्थितीत काजोलची प्रतिक्रिया थोडी विचित्र होती, कारण काजोलला हा प्रश्न फारसा आवडला नाही. पण काजोलने उत्तर दिलं की, अजय देवगण दारात चांगलीच शॉटगन घेऊन तयार असेल जे मुलीसाठी खूप धोकादायक असू शकतं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अजय देवगण त्याच्या मुलांसोबत एक खास बॉन्डिंग शेअर करतो. न्यासा घराबाहेर पडली की वडील अजय देवगण काळजीत पडतो. तो पत्नी काजोलला वारंवार मुलीबद्दल प्रश्न विचारतो. याचा खुलासाही काजोलने तिच्या एका मुलाखतीत केला होता. जिथे तिने सांगितलं होतं की, न्यासा घरातून बाहेर पडल्यावर अजय देवगण शांत बसत नाही आणि मला वारंवार प्रश्न विचारतो की, ती कधी येणार? ती कुठे गेली.. त्यामुळे अजय देवगणचं आपल्या मुलीवर किती प्रेम आहे याचा अंदाज येतो.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x