कॅमेरासमोरच पुनम पांडे बोल्ड ; सगळ्यांसमोर अंघोळ करण कितपत योग्य?

 कंगना रानौतचा रिएलिटी शो 'लॉकअप' दररोज खूप धमाके करत आहे.

Updated: Apr 28, 2022, 01:32 PM IST
कॅमेरासमोरच पुनम पांडे बोल्ड ; सगळ्यांसमोर अंघोळ करण कितपत योग्य? title=

मुंबई : कंगना रानौतचा रिएलिटी शो 'लॉकअप' दररोज खूप धमाके करत आहे. शो फिनालेच्या अगदी जवळ आला आहे आणि अशा परिस्थितीत सगळे स्पर्धक लोकांचं जास्तीत जास्त लक्ष वेधून घेण्यासाठी काहीही करत आहेत. नुकतंच, लॉकअपच्या आत एक कौटुंबिक कार्य होतं. ज्यामध्ये सगळ्या स्पर्धकांचे कुटुंबीय त्यांना भेटायला आले होते.

यावेळी पूनम पांडे सर्वात भावूक झाली. खरंतर पूनमला वाटत होतं की तिच्या घरातून कोणी येणार नाही पण नंतर तिची आई तिथे आली. आईला पाहताच पूनम रडू लागली आणि तिने तिला वचन दिलं की ती या शोमध्ये आणखी पुढे जाईल. आता लॉक अपच्या एपिसोडमध्ये पूनम पांडेने असं काम केलं आहे की, ते पाहून सगळेच थक्क झाले आहेत.

पूनम पांडे उघडपणे अंघोळ करू लागली
लॉक अपच्या नवीन एपिसोडमध्ये, पूनम पांडे ठरवते की, ती यार्ड परिसरात अंघोळ करेल. याआधी शिवम शर्मा तिथे आंघोळ करतो. साईशा शिंदे आणि प्रिन्स नरुला यांना पूनम पांडेच्या निर्णयाची माहिती मिळताच त्यांनी लगेच मुनव्वर फारुकीला कळवलं. यानंतर प्रिन्स म्हणतो की, त्यामुळे ती बाहेर जात नाही.

त्यानंतर लगेचच मुनव्वर फारुकी गंमतीने म्हणतो की, मी रमजानमध्ये हे सगळं पाहू शकत नाही. थोड्या वेळाने मुनव्वर पुन्हा पूनमबद्दल बोलतो की, ''आता पूनम निर्मात्यांना जे हवे आहे ते देत आहे आणि अशा परिस्थितीत ती शो सोडण्याची शक्यता वाढली आहे. मुनव्वर फारुकीचे म्हणणे ऐकून प्रिन्स नरुला म्हणतो की, असं होणार नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मुनव्वर-प्रिन्सची मस्ती 
लॉक अपच्या ताज्या एपिसोडमध्ये संपूर्ण लक्ष पूनम पांडेवर केंद्रित करण्यात आलं आहे. प्रिन्स नरुला आणि मुनव्वर फारुकी म्हणतात की, निर्माते तिला अंतिम फेरीपूर्वीच विजेता बनवतील. तिला एक आठवडा अगोदर ट्रॉफी देतील. दोघांची मस्ती बराच वेळ चालते आणि दुसरीकडे पूनम पांडे सर्वांचे लक्ष तिच्याकडे वेधून घेते.