आकाश - श्लोकाचा हायप्रोफाइल स्वागत सोहळा, दिग्गज मंडळींची उपस्थिती

आकाश - श्लोकाच्या स्वागत सोहळ्यात अनेक सेलेब्रिटी, राजकारणी, क्रिडा-कला क्षेत्रतील अनेक दिग्गज मंडळी उपस्थितीत होते.

Updated: Mar 11, 2019, 10:54 AM IST
आकाश - श्लोकाचा हायप्रोफाइल स्वागत सोहळा, दिग्गज मंडळींची उपस्थिती

मुंबई : बॉलिवूड किंवा मोठ्या उद्योगपतींच्या घरातलं लग्न म्हंटलं तर आनेक दिग्गज मंडळी नवविवाहित दाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी एकत्र येतात. मगील काही दिवसांपासून उद्योगपती मुकेश अंबानींचा मुलगा आकाश अंबानी आणि हीरे व्यापारी रसेल मेहतांची मुलगी श्लोका मेहता यांचा विवाहा सोहळा मोठ्या थाटात पार पाडला. नुकताच झालेल्या स्वागत सोहळ्यात अनेक सेलेब्रिटी, राजकारणी, क्रिडा-कला क्षेत्रतील अनेक दिग्गज मंडळी उपस्थितीत होते. या स्वागत सोहळ्यात आकाश - श्लोका फार सुंदर दिसत होते. आकाश ने शेरवानी घातली होती तर श्लोकाने सोनेरी रंगाचा लेहंगा घातला होता. 

स्वगत सोहळ्यात राजकुमार हिरानी त्यांच्या पत्नी सोबत आले होते. त्यानंतर विधू विनोद चोप्रा त्यांच्या कुटुंबा समवेत सोहळ्यात उपस्थित होते. त्याचप्रमाणे बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला ही स्वागत सोहळ्यात उपस्थित होती. 

Akash Ambani and Shloka Mehta

Akash Ambani and Shloka Mehta Wedding Party

Akash Ambani and Shloka Mehta Wedding Party

Akash Ambani and Shloka Mehta

Akash Ambani and Shloka Mehta

शनिवारी ९ मार्च रोजी आकाश - श्लोका विवाह बंधणात अडकले. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे नव्याने तयार केलेल्या सम्मेलन केंद्रात लग्न समारंभ संपन्न झाला. हे केंद्र अंबानी कुटुंबा द्वारे चालवण्या जाणाऱ्या शाळेपासून थोड्याच अंतरावर आहे. या शाळेत आकाश - श्लोकाने एकत्र शिक्षण घेतले होते. या लग्न सोहळ्यात रजनीकांत, अमिताभ बच्चन, आमिर खान, शाहरुख खान, रणबीर कपूर, प्रियंका चोपड़ा, विद्या बालन, अभिषेक बच्चन आणि एश्वर्या राय बच्चन यांच्या व्यतिरिक्त अनेक दिग्गज मंडळी सहभागी होते.