अक्षय कुमारच्या मुलीचं बदलेलं रुप पाहून चाहते हैराण; व्हिडिओ व्हायरल

या दोघांना एक मोठा मुलगा आरव असून तो २० वर्षांचा आहे. मात्र त्याच्या मुलीचा लूक पुर्णपणे बदलला आहे.

Updated: Dec 23, 2022, 07:58 PM IST
अक्षय कुमारच्या मुलीचं बदलेलं रुप पाहून चाहते हैराण; व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या चित्रपटांबद्दल चांगलाच चर्चेत आहे. अक्षय कुमार आणि त्याचे कुटुंब सोशल मीडियावर चांगलेच प्रसिद्ध आहेत. गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्या फ्लॉप सिनेमांमुळे चर्चेत राहिला. आता अक्षय त्याच्या मुलीसोबत स्पॉट झाला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार आपली मुलगी नितारा हिचा हात धरून चालताना दिसत आहे. नितारा आता मोठी झाली असून उंचीने वडिलांच्या खांद्याएवढी झाली आहे. मुलगी नितारा सुद्धा फार गोंडस दिसत होती.

यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा टॉप घातला आहे. अलीकडेच तिच्या 10व्या वाढदिवसानिमित्त अक्षयने तिच्यासोबतचा एक फोटो व्हिडिओ शेअर करून तिला गोड शुभेच्छा दिल्या. हात धरून वाळूवर धावतानाचा एक व्हिडिओ अभिनेत्याने शेअर केला आहे. व्हिडिओच्या शेवटी एक फोटो आहे ज्यामध्ये नितारा तिची शॉपिंग बॅग धरून आहे. नितारा ही अक्षय आणि पत्नी ट्विंकल खन्ना यांची दुसरी मुलगी आहे.

या दोघांना एक मोठा मुलगा आरव असून तो २० वर्षांचा आहे. मुलगी नितारासोबतचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत अक्षयने कॅप्शनमध्ये लिहिलं की, "माझा हात धरण्यापासून ते आता तिची शॉपिंग बॅग घेऊन जाण्यापर्यंत, माझी मुलगी खूप वेगाने मोठी होत आहे. आज ती 10 वर्षांची झाली आहे... तुला तुझ्या वाढदिवसाच्या डॅडीकडून खूप शुभेच्छा. आय लव्ह यू."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

काही दिवसांपूर्वी अक्षय निताराचा हात धरून चालतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. यासोबत अभिनेत्याने लिहिलं होतं की, "काल माझ्या मुलीला एका पार्कमध्ये नेले. तिचा आनंद पाहून आणि तिच्यासाठी एक नाही तर दोन खेळणी जिंकताना मला हिरोसारखे वाटलं. #BestDayEver." ट्विंकलने कमेंट सेक्शनमध्ये हार्ट इमोजींचा वर्षाव केला.

अक्षय  राम सेतू या चित्रपटात दिसला. त्याचा हा चित्रपट 25ऑक्टोबरला  प्रदर्शित झाला आहे. या वर्षात आतापर्यंत प्रदर्शित झालेले त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकले नाहीत.