Akshay Kumar च्या सुर्यवंशी सिनेमातील गाणं रिलीज

अभिनेता अक्षय कुमारच्या अ‍ॅक्शन फिल्म 'सूर्यवंशी' मधील 'आयला रे आयला' हे गाणे रिलीज झाले आहे.

Updated: Oct 21, 2021, 07:18 PM IST
Akshay Kumar च्या सुर्यवंशी सिनेमातील गाणं रिलीज

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारच्या अॅक्शन फिल्म 'सूर्यवंशी' मधील 'आयला रे आयला' हे गाणे रिलीज झाले आहे. स्वतः अक्षयनेही हे गाणे सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहे. गाण्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, "सूर्यवंशी, सिंघम आणि सिम्बा एकत्र येत असताना 'आयला रे आयला' गाणे रिलीज होण्यापेक्षा ते कमी नाही. 'सूर्यवंशी' 5 नोव्हेंबर, बॅक टू सिनेमाजमध्ये रिलीज होईल. "

2010 मध्ये रिलीज झालेल्या अक्षय कुमारच्या 'खट्टा मीठा' चित्रपटातील 'आयला रे आयला' हे गाणे आहे. जे 'सूर्यवंशी' साठी पुन्हा तयार करण्यात आले आहे.

हे गाणे दलेर मेहंदीने गायले आहे. हे गाणं मूळतः प्रीतमने संगीतबद्ध केले आहे आणि नितीन रायकर यांनी लिहिले आहे. पुनर्निर्मित आवृत्तीचे संगीत तनिष्क बागचीने तयार केले आहे आणि गाण्याचे नवीन शब्द शब्बीर अहमद यांनी लिहिले आहेत.

 

पोलिसांच्या वर्दीत अक्षय, अजय आणि रणवीरचा जबरदस्त डान्स

अजय देवगण आणि रणवीर सिंग अक्षय कुमारसोबत 'आयला रे आयला' या रिक्रिएट व्हर्जनमध्ये त्यांच्या पोलिस अवतारात नाचताना  दिसत आहेत. गाण्यात, तीन कलाकार पोलिसांच्या वर्दीत 'सिंघम' सिग्नेचर स्टेप, पेल्विक थ्रस्ट आणि ट्वर्क करताना दिसतात. मात्र, या गाण्यात कतरिना कैफ दिसत नाही.