Rohit Shetty सोबत मस्ती Akshya Kumar ला पडली भारी, थेट आपटला तोंडावर !

कोणाच्या कॅमेरात कैद झाला हा प्रकार  

Updated: Nov 18, 2021, 07:18 PM IST
Rohit Shetty सोबत मस्ती Akshya Kumar ला पडली भारी, थेट आपटला तोंडावर ! title=

मुंबई : सध्या सुर्यवंशी या सिनेमाची सगळीकडेच हवा आहे. त्यात या सिनेमातील अक्षय कुमारचा अॅक्शन पॅक अंदाज सगळ्यांनाच आवडतो आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाछी  देखील संपुर्ण टीम विशेष मेहनत घेतना दिसत आहे. रिलीजनंतर ही प्रमोशन सुरुच आहे. 

दिग्दर्शक रोहित शेट्टी , अभिनेता अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांचा रिलीज आधीचा एक प्रमोशनचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात अक्षय आणि रोहित शेट्टीची मजामस्ती दिसून येत आहे. 
अक्षय रोहित शेट्टीच्या मांडीवर झोपलेला दिसत आहे, तर कतरिना हा व्हिडिओ शूट करत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

यावेळी अक्षयला उठवण्यासाठी रोहित प्रयत्न करताना दिसतोय. पण अक्षय रोहित शेट्टीला थांबवण्याच्या नादात थेट जमिनीवर कोसळतो. दोघेही प्रमोशनसाठी खूप एक्साईटेड आहेत. आणि घाईने जाण्याच्या नादात दोघेही जमिनीवर पडल्याचं दिसत आहे.

हा सगळा प्रकार कतरिनाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. सुर्यवंशी या सिनेमाला सिनेमागृहात प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे.