महाराष्ट्रात 16 नव्या स्मार्ट सिटी उभारणार? समृद्धी महामार्गलगतच्या 10 जिल्ह्यांमध्ये मेगा प्रोजेक्ट

Smart City : महाराष्ट्रात 16 नव्या स्मार्ट सिटी उभारल्या जाणार आहेत. समृद्धी महामार्गालगत 16 ठिकाणी स्मार्ट सिटी उभारण्याचा सरकारचा मास्टरप्लान आहे. 

वनिता कांबळे | Updated: Dec 29, 2024, 06:03 PM IST
महाराष्ट्रात 16 नव्या स्मार्ट सिटी उभारणार? समृद्धी महामार्गलगतच्या 10 जिल्ह्यांमध्ये मेगा प्रोजेक्ट    title=

Samruddhi Mahamarg : मुंबई-नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग आहे. 700 किलोमीपेक्षा मोठा असा हा महामार्ग 700 किलोमीपेक्षा मोठा आहे.  मुंबई ते नागपूरला असा हा महामार्ग महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांना जोडणारा असून 390 गावांमधून जात आहे. समृद्धी महामार्ग हा भविष्यात मोठा गेम चेंजर ठरणार आहे. समृद्धी महामार्गालगत 16 ठिकाणी स्मार्ट सिटी उभारल्या जाणार आहे. याबाबत महायुती सरकारचा मास्टरप्लॅन रेडी आहे. 

हे देखील वाचा... महाराष्ट्रात उभारणार चौथी मुंबई; मुंबई, नवी मुंबई आणि तिसऱ्या मुंबईपेक्षा सुपर कनेक्टिव्हिटी असणारे शहर

या मार्गाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे नाव देण्यात आले आहे.  समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर प्रवास फक्त 6 तासांत पूर्ण होणार आहे. समृद्धी महामार्गील नागपूर ते शिर्डी या 520 किमी लांबीच्या पहिला टप्पा प्रवाशांसाठी खुला झाला. यानंतर शिर्डी ते नाशिक जिल्ह्यातील भरवीर इंटरचेंजपर्यंत एकूण 80 किमी लांबीचा टप्पा देखील प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला आहे. एकूण 701 किमी पैकी 625 किमी लांबीचा मार्गावरुन वाहतूर सुरु झाली आहे.  इगतपुरी ते आमणे मार्ग हा 76 किमी लांबीचा टप्पा हा समृद्धी महामार्गील शेवटचा टप्पा आहे. या टप्पा सुरु झाल्यावर मुंबई ते नागपूर सहा तासांचा सुपरफास्ट प्रवास होणार आहे. 

हे देखील वाचा... भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे विमानतळ आपल्या महाराष्ट्रात; एकावेळी उभी राहतील 350 विमाने

समृद्धी महामार्गाचे काम आता जवळपास पूर्णत्वास आले आहे. येत्या काही दिवसांत समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा ही कार्यान्वित होणार आहे. समृद्धी महामार्गावर 16 ठिकाणी स्मार्ट सिटी तयार करण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. समृद्धी महामार्गालगतचा स्मार्ट सिटी प्रकल्प लवकरच पूर्णत्वात येण्याचा महायुती सरकारचा संकल्प आहे. 30 डिसेंबर रोजी या प्रकल्पाशी संबंधित उच्चस्तरीय बैठक बोलवण्यात आली आहे. 

समृद्धी महामार्गामुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. स्मार्ट सिटी असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल निर्यात करायसाठी जेएनपीटी, वाढवन अशा बंदरांना थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. आसपासच्या लघुउद्योगांना चालना मिळेल.आयात-निर्यातीचे प्रमाण वाढल्याने स्थानिकांना याचा फायदा होणार आहे. 

स्मार्ट सिटी प्रकल्पा अंतर्गत समृद्धी महामार्गालगत 16  ठिकाणी स्मार्ट सिटीची निर्मिती केली जाणार आहे. 

1- विरुल (चेनेज - 80 ) वर्धा.
2 - दत्तपुर ( चेनेज - 105.7) अमरावती.
3 - शिवनी ( चेनेज - 137.5) अमरावती.
4 - शेह ( चेनेज - 182.5 ) कारंजा वाशिम.
5 - वानोज ( चेनेज - 210.5 ) वाशिम.
6 - रिधोरा ( चेनेज - 239.6 ) वाशिम.
7 - साब्रा ( चेनेज - 283.3) मेहकर बुलढाणा
8 - माळ सावरगाव ( चेनेज - 340) बुलढाणा
9 - जामवाडी ( चेनेज - 365) जालना.
10 - हडस पिंपळगाव ( चेनेज -470)
11 - जांबरगाव (चेनेज - 488.5) संभाजीनगर.
12 - धोत्रा (चेनेज 505) कोपरगाव नगर.
13 - सावळा विहीर (चेनेज - 520) नगर.
14 - फुगाले (चेनेज - 635) ठाणे.
15 - सपगाव (चेनेज - 670 ) ठाणे.
16- लेणाड (चेनेज - 673) ठाणे.