बॉलिवूड अभिनेत्याच्या आईचं निधन

अभिनेत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केलं दुःख.   

Updated: Jun 18, 2020, 02:13 PM IST
बॉलिवूड अभिनेत्याच्या आईचं निधन  title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधून सतत दुःखद बातम्या समोर येत आहेत. बुधवारी अभिनेता  अली फजल (Ali Fazal)च्या आईचं निधन झालं आहे. प्रकृती स्थिर नसल्यामुळे लखनऊच्या राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  अलीच्या जवळच्या प्रवक्त्यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. 'बुधवारी सकाळी अली फजलच्या आईचं निधन झालं आहे. आईचं अचानक निधन झाल्यामुळे अलीला मोठा धक्का बसला आहे. 

सिनेमा जगत से आई एक और बुरी खबर, अभिनेता Ali Fazal की मां का हुआ निधन

शिवाय अलीने देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं दुःख व्यक्त केलं आहे. 'मी तुझ्यासाठी माझं उर्वरित आयुष्य जगेल. आपला प्रवास इथं पर्यंतचं होता.' अशी भावूक पोस्ट त्याने  आपल्या आईसाठी लिहिली आहे. त्याचप्रमाणे त्याने त्याच्या आईचा फोटो देखील पोस्ट केला आहे. 
 

अलीची  गर्लफ्रेंड अभिनेत्री  ऋचा चड्डाने देखील अलीच्या आईला सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. 

सांगायचं झालं तर, अली आणि ऋचा १५ एप्रिल रोजी विवाह बंधनात अडकणार होते परंतू कोरोना व्हायरसच्या फैलावामुळे त्यांना त्याचं लग्न रद्द करावं लागलं.