रणबीरचा भूतकाळ आलियासमोर, एक्स गर्लफ्रेंड आणि ब्रेकअपबद्दल काय म्हणतेय पाहा... 

 बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट सध्या त्यांच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत.

Updated: Apr 6, 2022, 05:12 PM IST
रणबीरचा भूतकाळ आलियासमोर, एक्स गर्लफ्रेंड आणि ब्रेकअपबद्दल काय म्हणतेय पाहा...  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट सध्या त्यांच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत. अनेकवेळा दोघांनीही मुलाखतींमध्ये एकमेकांशी जवळीक असल्याचे संकेत दिले आहेत. आलिया भट्टआधी रणबीर कपूरने दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफला डेट केलं आहे. विशेष म्हणजे, आलिया भट्टने एकदा एका मुलाखतीत रणबीर कपूरच्या ब्रेकअपबद्दल आणि त्याच्या एक्स गर्लफ्रेंडबद्दल बोलताना एक अतिशय मनोरंजक प्रतिक्रिया दिली होती.

आलिया भट्टची जूनी मुलाखत 
2019 मध्ये एका मुलाखतीदरम्यान, जेव्हा आलियाला रणबीरच्या एक्स रिलेशनशिपबद्दल आणि ब्रेकअपबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा अभिनेत्रीने आपल्या पास्ट रिलेशनशिपवर ईशारा दिला. इतकंच नाही तर सुमारे तीन वर्षांपूर्वी दिलेल्या या मुलाखतीत आलिया भट्टने रणबीर कपूरसोबतच्या लग्नावरही प्रतिक्रिया दिली होती.

रणबीर कपूरला म्हणाली हिरा 
फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीत आलियाने रणबीर कपूरचं खूप कौतुक केलं होतं आणि त्याला 'हिरा' म्हटलं होतं. आलिया भट्ट म्हणाली की, "मी तुम्हाला सांगू इच्छितो की, तो वाईट नाही तर तो एक अतिशय साधा माणूस आहे. तो इतका चांगला माणूस आहे की, अनेकदा मला वाटतं की, कदाचित मी त्याच्यासारखी चांगली असू शकले असते.

एक अभिनेता म्हणून, एक व्यक्ती म्हणून, प्रत्येक बाबतीत तो खूप चांगला आहे. तो माझ्यापेक्षा खूप चांगला माणूस आहे. आणि लग्न करण्याविषयी? केवळ हीच एक गोष्ट आहे जी मला खूप त्रास देते. रोज सकाळी मला माझं लग्न असल्याची बातमी मिळते. मला या बातम्यांनी धक्का बसायचा पण आता मला याची सवय झाली आहे.''