Paris Olympics 2024: ऑलम्पिक विलेज बनलं कंडोमचं मार्केट, वेलकम किटमध्ये खेळाडुंना मिळतेय 'अशी' सुविधा

Paris Olympics 2024: खेळाडुंना वेलकम किटसोबत अशा वस्तू दिल्या जात आहेत, ज्याची चर्चा वेगाने पसरु लागली आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Jul 27, 2024, 09:25 AM IST
Paris Olympics 2024: ऑलम्पिक विलेज बनलं कंडोमचं मार्केट, वेलकम किटमध्ये खेळाडुंना मिळतेय 'अशी' सुविधा title=
ऑलिम्पिक खेळाडुंना वेलकम किटमध्ये कंडोम

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकला सुरुवात झाली आहे. चार वर्षातून एकदा होणाऱ्या खेळांचा महाकुंभ 26 जुलैपासून सुरु झाले असून 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यात भारताचं 117 खेळाडूंचं पथक सहभागी झालं आहे. या सोबतच जगभरातील एकूण दहा हजारहून अधिक थलिट्स पॅरिल विलेजमध्ये थांबले आहेत. त्यांना प्रत्येक प्रकारची सुविधा दिली जातेय. राहण्या-खाण्यापासून ते थलिट्सच्या वैयक्तिक आयुष्याची काळजी घेतली जात आहे. दरम्यान खेळाडुंना वेलकम किटसोबत अशा वस्तू दिल्या जात आहेत, ज्याची चर्चा वेगाने पसरु लागली आहे. वेलकम किटमध्ये कंडोम आणि इंटिमसी संबधी वस्तू दिल्या जात असल्याचे वृत्त माध्यमांतून समोर आले आहे. 

साधारण 2 लाख कंडोमची व्यवस्था 

ऑलिम्पिक खेळांच्या सुरुवातीपासूनच खेळाडुंची खास काळजी घेतली जात आहे. ऑलम्पिक विलेज कंडोमचं मार्केट बनलंय की काय? असा प्रश्न विचारावा इतकं प्रकरण पुढे गेलंय. मेगा इव्हेंटमध्ये साधारण 10 हजारहून जास्त थलिट्स सहभागी झाले आहेत. डेली मेलच्या रिपोर्ट्सनुसार, अ‍ॅथलिट्ससाठी साधारण 2 लाख कंडोमची व्यवस्था करण्यात आली आहे.प्रत्येक थलिट्सला 14 कंडोम देण्याचे प्रावधान आहे. एवढेच नव्हे तर वेलकम किटमध्ये इंटिमसी संदर्भातील अनेक वस्तू आहेत. 

10 हजार डेंटल डेम्स 

वेलकम किटमध्ये एक फोन आणि डेंटल डेम्सदेखील दिला जात आहे. खेळाडू त्यांना मिळालेल्या वेलकम किटचे फोटो शेअर करत आहेत. खेळ संपल्यानंतर खेळाडु त्यांचे आयुष्य एन्जॉय करतील. ओपनिंग सेरेमनीसाठी मंच सजवण्यात आलाय. सीन नदीमध्ये मार्चपास्ट पाहायला मिळणं, असे पहिल्यांदाच होणार आहे. या परेडमध्ये साधारण 94 होड्या सहभागी होती. साधारण 6 किलोमीटरपर्यंत ही परेड चालणार आहे. 

ऑलिम्पिकमध्ये 5 रिंग का असतात, त्यांचा अर्थ काय? जाणून घ्या पाच रंगांची कहाणी

खाण्यासंदर्भात भारतीय खेळाडुंकडून तक्रार 

पॅरिसमध्ये ऑलम्पिकसाठी पोहोचलेल्या भारतातील काही खेळाडुंनी तिथल्या खाण्याबाबत तक्रार केली आहे. खाणे योग्य नसल्याने उपाशी राहण्याची वेळ त्यांच्यावर आलीय. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय अॅथलिट खाण्याच्या सुविधेपासून संतुष्ट नाहीत.खाण्यामध्ये ग्लोबल क्विजीन, हलाल फूड, आशियाई मिल आणि फ्रेंच फूडसाठी 5 वेगवेगळे हॉल आहेत. 

तिथे राजमा होता पण आम्ही पोहोचण्याआधीच तो संपला होता,असे भारताची डबल बॅडमिंटन स्टार तनिषा क्रेस्टोनने म्हटले आहे.भारताची बॉक्सर अंतिम पघालदेखील पॅरिस ऑलम्पिक आयोजकांनी दिलेल्या खाण्यावर नाराज आहे.तिने आपल्या सपोर्ट टिमला इंडियन खाण्याची ऑर्डर केली होती.

पॅरिस ऑलिम्पिकचं बिगुल वाजलं, 16 खेळांमध्ये भारताचे 117 खेळाडू... पाहा भारताचं संपूर्ण वेळापत्रक

भारताचं 117 खेळाडूंच पथक

पॅरिस ऑलिम्पिकसाठी (Paris Olympic) भारताचं  (India) 117 खेळाडूंचं पथक पाठवण्यात आलं आहे. यात दोनवेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या पी व्ही सिंधु (PV Shindhu) आणि 2020 टोकिया ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्राचा (Neeraj Chopra) समावेश आहे. या दोघांकडून पुन्हा पदकांची आशा आहे. भारतीय पथकात महाराष्ट्रातील पाच खेळाडूंचा तर हरियाणातील सर्वाधिक खेळाडूंचा समावेश आहे.