कामाठीपुरातल्या गंगुबाईचं आयुष्य जगण्यासाठी आलियाला मिळाले कोट्यवधी रुपये

कामाठीपुरातल्या गंगुबाईला जीवनात अनेक संकटांचा सामना करावा लागला...  

Updated: Jan 11, 2022, 10:59 AM IST
कामाठीपुरातल्या गंगुबाईचं आयुष्य जगण्यासाठी आलियाला मिळाले कोट्यवधी रुपये  title=

मुंबई : काही वर्षांपासून चित्रपटांच्या माध्यमातून अनेक कर्तृत्ववान व्यक्तींचे बायोपिक साकारण्यात आले. ज्यामुळे त्यांचा प्रवास आणि त्यांची मेहनत लोकांपर्यंत पोहोचली. यानंतर आता लवकरचं 'गंगुबाई काठियावाडी' चित्रपटाच्या माध्यमातून कामाठीपुरातल्या गंगुबाईचा खडतर प्रवास सर्वांसमोर येणार आहे. चित्रपटात त्यांच्या भूमिकेला न्याय देताना अभिनेत्री आलिया भट्ट दिसणार आहे. त्यामुळे आलियाला नव्या भूमिकेत पाहाण्यासाठी चाहते सज्ज झाले आहेत. 

कारण 'गंगुबाई काठियावाडी' चित्रपटाच्या माध्यमातून मुंबईत देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न दिग्दर्शक संजय लिला भंसाळी यांनी केला आहे. ज्यामुळे त्यांचं खडतर आयुष्य सर्वांसमोर येणार आहे. 

‘मुंबईची माफिया क्वीन’ म्हणून ओळख असणाऱ्या आणि सेक्सवर्कर महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या गंगुबाई यांनी जीवन जगताना अनेक वाईट, कधी न विसरू शकणाऱ्या गोष्टींचा सामना केला. पण रूपेरी पडद्यावर त्यांचं आयुष्य जगण्यासाठी आलियाला मात्र कोट्यवधी रुपयांचं मानधन मिळालं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मिळालेल्या माहितीनुसार 'गंगुबाई काठियावाडी' चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासाठी आलिया जवळपास 20 कोटी रूपयांचं मानधन मिळालं असल्याचं सांगण्यात येत आहे. 

'गंगुबाई काठियावाडी' चित्रपटाशिवाय आलियाकडे आणखी चित्रपट आहेत. आलिया येत्या काळात 'आरआरआर', 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे आलिया आणि अभिनेता रणबीर कपूर चित्रपटातून पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.