लग्नानंतर आलिया भट्ट रणबीर कपूर नाही तर 'या' व्यक्तीला म्हणतेय डार्लिंग

आलिया भट्टने प्रेग्नेंसीची घोषणा केल्यापासून चाहत्यांची नजर तिच्या प्रत्येक पोस्टकडे लागली आहे.

Updated: Jul 4, 2022, 08:45 PM IST
लग्नानंतर आलिया भट्ट रणबीर कपूर नाही तर 'या' व्यक्तीला म्हणतेय डार्लिंग title=

मुंबई : आलिया भट्टने प्रेग्नेंसीची घोषणा केल्यापासून चाहत्यांची नजर तिच्या प्रत्येक पोस्टकडे लागली आहे. त्याचबरोबर तिच्या प्रत्येक पोस्टची चर्चा इतकी असते की, ती पोस्ट काही मिनिटांत व्हायरल होते. आता आलियाने सोशल मीडियावर एक छोटासा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आलिया काहीतरी बोलताना दिसत आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये अभिनेत्री दिसत नसून फक्त आवाज ऐकू येत आहे. हा व्हिडिओ दूसरा-तिसरा काही नसून अभिनेत्रीचा आगामी चित्रपट डार्लिंग्सचा आहे.

टीझर रिलीजची घोषणा वेगळ्या पद्धतीने करण्यात आली
आलिया भट्टच्या डार्लिंग्स चित्रपटाची घोषणा खूप आधी झाली होती. मात्र आतापर्यंत चित्रपटातून कोणाचाही लूक बाहेर आलेला नाही. त्याचबरोबर आलियाने सोशल मीडियावर एक छोटासा व्हिडिओ शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'थोडा डार्क... थोडा कॉमेडी... डार्लिंग. उद्या टीझर प्रदर्शित होणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

काय खास आहे या व्हिडिओमध्ये
आलियाने 'डार्लिंग' या चित्रपटाचा एक छोटा व्हिडिओ रिलीज केला आहे. ज्यामध्ये तीन लोकं आपापसात बोलताना दिसत आहेत. एक व्यक्ती आलियाला म्हणत आहे, 'इथे डार्क डार्क का आहे, डार्लिंग.' यावर आलिया म्हणते- 'मी तर म्हणाले होते ना की डार्क आहे. अंडी आणली? ' तितक्यात एक व्यक्ती म्हणते, ' ईथे डार्क आहे, मग आई आणि मुलगी दोघी का बकवास हसत आहेत?' तेव्हा शेफाली शहा म्हणते, 'जावई काय करू, कॉमेडी पण आहेच.' मग ती व्यक्ती म्हणते, 'सध्या खूप सस्पेन्स वाढत आहे.' तेव्हा आलिया म्हणते- 'थांबा. समजेल.