आलियाने लग्नासाठी ऑर्डर केला सब्यासाचीचा लेहंगा?

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट विवाहबंधनात अडकणार...

Updated: Jul 23, 2019, 10:10 PM IST
आलियाने लग्नासाठी ऑर्डर केला सब्यासाचीचा लेहंगा?

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या लग्नाच्या चर्चा या सोशल मीडियावर जोर घेत आहे. सध्या ‘स्पॉटबॉय इ’च्या मिळलेल्या वृत्तानुसार आलियाने सब्यसाचीकडून एक लेहंगा आर्डर केला आहे. यापूर्वी सब्यसाची मुखर्जीने बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण,प्रियंका चोप्रा आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नातील कपडे डिझाइन केले आहेत. 

आलिया आणि रणबीर २०१८ पासून एकमेकांना डेट करत असून पुढील वर्षी विवाहबंधनात अडकणार असल्याचा अंदाज आहे. आलियाने यापूर्वीही सब्यसाची मुखर्जीने डिझाइन केलेले कपडे अनेक कार्यक्रमात वापरले आहेत. त्यामुळे लग्नासाठीही तिने सब्यसाची मुखर्जीची निवड केली असेल तर यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. 

काही दिवसांपूर्वीच भट्ट आणि कपूर कुटुंब लग्नाची तारीख ठरवण्यासाठी भेटले होते. आलिया आणि रणबीरचा आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी असून आलिया आणि रणबीर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसतील. यानंतर आलिया 'सडक २' ‘इंशाल्लाह’या चित्रपटात झळकणार असून रणबीरसुद्धा लवकरच 'शमशेरा' चित्रपट या चित्रपटाद्वारे रूपेरी पडद्यावर झळकणार आहे.