Alia Bhatt च्या सुंदर फोटोजचा नजराणा, पोस्ट केले Underwater Photo

ब्रेन विथ ब्युटी असं म्हणायला हरकत नाही

Updated: Mar 21, 2021, 07:31 AM IST
Alia Bhatt च्या सुंदर फोटोजचा नजराणा, पोस्ट केले  Underwater Photo title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते. आलियाने नुकतेच काही फोटो शेअर केलेत ज्यामुळे तिचे चाहते खूप एक्सायटेड आहेत. आलिया या फोटोत अगदी एखाद्या जलपरी प्रमाणे दिसत आहे. 

आलिया बनली जलपरी 

आलिया भट्ट (Alia Bhatt Instagram) ने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर काही फोटो शेअर केले. कॅप्शन देताना म्हणते की,'हे अतिशय शानदार फोटो आहेत.' या फोटोत आलिया पाण्यात पोहताना दिसत आहे. याचदरम्यान आलियाने खूप छान पोझ दिल्या आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Alia Bhatt (@aliaabhatt)

आलियाने या फोटोशूट करता पिवळ्या आणि राखाडी अशा रंगाची बिकिनी घातली आहे. यामध्ये आलिया अतिशय सुंदर दिसत असून पोस्टमध्ये काही इमोजी शेअर केलेत. (आलिया भट्ट खऱ्या अर्थाने रणबीर कपूरची सपोर्ट सिस्टम)

 

सध्या करतेय रणबीरला मिस 

आलिया भट्ट गेल्या काही दिवसांपासून रणबीर कपूरपासून लांब आहे. रणबीर कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे असं घडतंय. काही दिवसांपूर्वी आलियाने रणबीरचा हात पकडलेला फोटो शेअर करून आपण त्याला किती मिस करत आहोत हे दाखवून दिलं होतं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Alia Bhatt (@aliaabhatt)

तसेच रणबीरने देखील आलियाच्या वाढदिवसाला खास पार्टी अरेंज केली होती. आपण तेथे नसलो तरीही तो तिच्यासोबत असल्याची खास भावना त्याने आलियाला दिली होती. आलिया भट्टचा 15 मार्चला वाढदिवस साजरा झाला. या दिवशी करण जोहरच्या (Alia Bhatt Birthday Party) घरी खास बर्थ डे पार्टी प्लान करण्यात आली होती. या पार्टीची जोरदार चर्चा रंगली. या पार्टीला आलियाचा बॉयफ्रेंड रणबीर कपूर उपस्थित नव्हता. तरी या पार्टीचं आणि रणबीरचं खास कनेक्शन आहे. करण जोहरने अरेंज केलेल्या (Ranbir Kapoor planed surprised party on Alia Bhatt Birthday )या पार्टीचं खास प्लानिंग रणबीर कपूरने केलेलं होतं.