Sonu Sood : स्पाईसजेटच्या विमानावर अवतरला सोनू सूद

रिल लाईफमधला विलन पण रिअल लाईफमध्ये कोट्यवधींचा हिरो बनलेल्या सोनू सूदला (Sonu Sood) स्पाईसजेटने अनोखं सरप्राईज दिलं आहे.  स्पाईसजेट (SpiceJet) या विमान कंपनीने आपल्या बोईंग ७३७ विमानावर सोनू सूदचे फोटो लावले आहेत. 

Updated: Mar 20, 2021, 06:10 PM IST
Sonu Sood : स्पाईसजेटच्या विमानावर अवतरला सोनू सूद title=

मुंबई : रिल लाईफमधला विलन पण रिअल लाईफमध्ये कोट्यवधींचा हिरो बनलेल्या सोनू सूदला (Sonu Sood) स्पाईसजेटने अनोखं सरप्राईज दिलं आहे.  स्पाईसजेट (SpiceJet) या विमान कंपनीने आपल्या बोईंग ७३७ विमानावर सोनू सूदचे फोटो लावले आहेत. 
स्पाईसजेटने ट्विट करून हे फोटोज आणि मेकिंगचा व्हीडिओही शेअर केला आहे. 

आपल्या ट्विटमध्ये स्पाईसजेटने म्हटलंय, की सोनू तू आमच्यासह अनेकांसाठी खूप मोठी प्रेरणा आहेत. आम्ही स्वत:ला भाग्यवान समजतो की, तुझ्या सत्कर्मात आम्हीही भागीदार होऊ शकलो.

 

सोनू सूदने जेव्हा लॉकडाऊनच्या (lockdown) काळात विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणलं होतं, तेव्हा स्पाईसजेटच्या माध्यमातून त्याला ते शक्य झालं होतं. एकीकडे केंद्र सरकारचं मिशन वंदे भारत सुरू होतेच, मात्र त्याचसोबत सोनूनेही परदेशात अडकलेल्या भारतीयांना मदतीचा हात पुढे केलेला. 

स्पाईसजेटने दिलेल्या या सरप्राईजबद्दल सोनू सूदनेही त्यांचे आभार मानले आहेत, शिवाय आज मला माझ्या पालकांची फार आठवण येतेय, असंही त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

 

कोरोना आणि लॉकडाऊन काळाज मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवणं, बसेसची सोय करणं, अन्नदान करणं, परदेशातून लोकांना परत आणणं अशा अनेक प्रकारची मदत सोनू सूदने केली होती. आजही आपली कोणती समस्या घेऊन सोनूकडे गेलं, तर सोनू एका झटक्यात त्याला आपल्या मदतीचा हात पुढे करतो. सोनूचे ट्विटर पाहिल्यावर आपल्यालाही ते लक्षात येईल. त्याच्या याच कार्याला स्पाईसजेटने विमानावर सोनूचे छायाचित्र लावत अनोखी सलामी दिली आहे.