मुंबई : माहेरची साडी हा सिनेमा मराठीतील हिट सिनेमापैकी एक आहे. विजय कोंडके निर्मिती आणि दिग्दर्शित या सिनेमाने खूप पसंती मिळवली होती. 1991 साली रिलीज झालेला हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. या सिनेमातून अल्का कुबल घरा-घरात पोहचल्या. अल्का कुबल व्यतिरिक्त या सिनेमात, रमेश भाटकर, अजिंक्य देव, विजय चव्हाण, विक्रम गोखले, उषा नाडकर्णी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. नुकतीच अलका कुबल यांनी लोकमत फिल्मीला मुलाखत दिली.
दिलेल्या मुलाखतीत अलका कुबल यांनी या सिनेमाबद्दल एक किस्सा त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. यावेळी बोलतान अलका कुबल यांनी सांगितलं की, ''मी बहुतेक वेळा ही आठवण सांगत असते. कारण, 'माहेरची साडी' मध्ये एका सीनसाठी मला तिरडीवर झोपायचं होतं. मला दिग्दर्शक विजय कोंडके यांनी या सीनबद्दल सगळं सांगितलं. ते म्हणाले, काही नाही ३ ते ४ तासात हा सीन संपेल. अजिंक्य, विक्रमजी यांचे काही डायलॉग असतील अशी सगळी कल्पना त्यांनी दिली. पहिल्या दिवशी मी त्या सीनचा आनंद घेत होते. सगळ्यांकडे बघत होते आणि त्यादिवशी नेमका सूर्यप्रकाश नाहीसा होऊन सगळीकडे एकदम मळभ वातावरण आलं. ''
पुढे अलका कुबल म्हणाल्या, ''त्यामुळे आमचे कॅमेरामन चारुदत्त म्हणाले होते की, आज हा सीन होऊ शकत नाही. अलका सॉरी तुला परत उद्या तिरडीवर झोपावं लागणार आहे. मी त्यांना म्हटलं काही नाही..मी खूप एन्जॉय केलं. पण, दुसऱ्या दिवशी तो सीन सुरू झाला आणि वेगळंच घडलं. ''दुसऱ्यादिवशी मला त्या तिरडीवर अजिबात झोपता येईना. कारण, अबीर-गुलाल, आदल्या दिवशीची फुलं सगळं तसंच होतं. तेव्हा मला असं वाटलं अरे…मी माझं मरण माझ्याच डोळ्याने पाहतेय की काय…त्यामुळे त्या तिरडीवर मला दुसऱ्या दिवशी झोपवेना. पण, नंतर शूट सुरू झाल्यावर मी पटापट शूटिंग केलं.'' असं अलका कुबल यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.''
अलका कुबल हे नाव या सिनेमामुळेच घरा-घरात पोहचलं. यानंतर त्यांनी अनेक हिट सिनेमा दिले. आजही या सिनेमाचे चाहचे खूप मोठ्या प्रमाणात आहेत. या सिनेमानंतर अलका कुबल यांचं आयुष्या पुर्णपणेच बदलून गेलं. इतकंच नाही तर 'माहेरची साडी' चित्रपट गावच्या जत्रांमध्ये आवर्जुन दाखवला जायचा असंही अलका कुबल यांनी या मुलाखतीत सांगितलं. अलका कुबलला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहायला त्यांचे चाहते उत्सुक आहेत.
QAT
(17.4 ov) 101
|
VS |
SDA
100/7(20 ov)
|
Qatar beat Saudi Arabia by 1 run | ||
Full Scorecard → |
RWA
(19.4 ov) 102
|
VS |
BRN
105/2(17.2 ov)
|
Bahrain beat Rwanda by 8 wickets | ||
Full Scorecard → |
BRN
(19 ov) 89
|
VS |
TAN
90/0(10.1 ov)
|
Tanzania beat Bahrain by 10 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.