मुंबई : प्रत्येक माणसात एक कलाकार दडलेला असतो. आपल्यातली कला जेव्हा त्याला कळते तेव्हा त्याला आयुष्याचं गमक सापडतं. वेळ प्रसंगानुसार प्रत्येकजण आपल्यातले कलागुण दाखवत असतो. वेटरचे काम करणाऱ्या अल्लारखाचंही त्याच्या कलेमुळे कौतूक होतयं. त्याच्या आवाजातल गायलेलं 'मेरे रश्के कमर' हे गाणं सर्वांच्याच पसंतीस पडतयं. नुसरत फतेह अली खान आणि राहत फते अली खान यांनी गायलेलं 'मेरे रश्के कमर' गाणं त्यावेळी युट्यूब सेन्सेशन बनल होतं. 'बादशाहो' सिनेमा इतकीच या गाण्याचीही चर्चा सगळीकडे होती. या गाण्यावरचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. पण अल्लारखाने गायलेलं गाणं हे यासर्वात स्पेशल ठरतंय. त्याच्या आवाजामूळे तो आता सगळीकडे ओळखला जातोय.
अल्लारखा हा २८ वर्षीय युवक असून. त्याला लहानपणापासूनच गायनाची आवड आहे. खारघरमधील एका हॉटेल मध्ये तो वेटरचं काम करतोय. आवाजासोबत त्याचा स्वभावही खूप छान असल्याचे इथे येणारे ग्राहक सांगतात.