Pushpa पाहताना रश्मिका, समंथावरच खिळल्या नजरा; पण त्यांना मागे टाकणारी बोल्ड 'दक्षा' कोण?

पाहा तोडीस तोड अभिनय करणारी दक्षा... 

Updated: Jan 24, 2022, 10:07 AM IST
Pushpa पाहताना रश्मिका, समंथावरच खिळल्या नजरा; पण त्यांना मागे टाकणारी बोल्ड 'दक्षा' कोण? title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या 'पुष्पा' या चित्रपटानं लोकप्रियतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. विविध भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं आतापर्यंत अनेकांनाच भुरळ पाडली. अल्लू अर्जुन (Allu Arjun), रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) स्टारर पुष्पा (Pushpa)मध्ये इतरही कलाकारांचा दमदार अभिनय पाहायला मिळत आहे. 

असं असतानाच जर तुम्ही पुष्पा पाहिला असेल, तर तुम्हाला आणखी एका चेहऱ्याची आठवण असेलच. 

एकिकडे समंथाचं मादक सौंदर्य, दुसरीकडे रश्मिकाची घायाळ करणारी अदा आणि तिसरीकडे 'दक्षा' ही भूमिका साकारत समोर येणारी अनसुया भारद्वाज. 

चित्रपटातून नकारात्मक भूमिका साकारत पुरुष पात्रालाही लाजवेल असाच अभिनय अनसुयानं या चित्रपटामध्ये केला आहे. 

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या घरात वावरत असताना तिच्या काळजाचा झालेला दगड, तिची बोलण्या- चालण्याची पद्धत आणि समोरच्याला नजरेतून धाक देण्याचा अंदाज पाहूनच थरकाप उडेल असा. 

दक्षिणायनी असं तिचं चित्रपटातील नाव. पण, दक्षा म्हणूनच तिची भीती इथं सर्वांच्या मनात घर करुन जाते. 

अतिशय ताकदीनं भूमिका साकारणारी दक्षा जितक्या दृश्यांमध्ये येते त्या प्रत्येक वेळी तिच्या अभिनयाला टाळ्यांनी दाद द्यावीशी वाटते असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 

(Anasuya Bharadwaj)हिला हल्लीच एका अशा प्रश्नाचा सामना करावा लागला होता, जिथं तिच्या वाढत्या वयावर निशाणआ साधला गेला होता. 

तुला आम्ही आँटी म्हणू की आक्का... ? असा प्रश्न या युजरनं केला. या प्रश्नाचं उत्तर देत अनसुयानं युजरची शाळाच घेतली. 

यापैकी काहीच बोलण्याइतकं तू मला ओळखत नाहीस. या नावांनी संबोधताना तुझ्या संगोपनावरच संशय येईल. कारण हे तर एज- शेमिंग झालं. आदर करणं शिक... अशा शब्दांत तिनं युजरला समज दिली. 

अतिशय मोजक्या पण तितक्याच स्पष्ट शब्दांत अनसुयानं तिची बाजू स्पष्ट केली आणि पुन्हा एकदा ती सर्वांची मनं जिंकून गेली.