ब्रेकअपच्या चर्चांनंतर करण जोहरच्या पार्टीत एकत्र दिसली सेलिब्रिटी जोडी

सोबतच त्यांचं खासगी आयुष्यही प्रकाशझोतात आलं

Updated: Oct 28, 2019, 01:37 PM IST
ब्रेकअपच्या चर्चांनंतर करण जोहरच्या पार्टीत एकत्र दिसली सेलिब्रिटी जोडी  title=

मुंबई : सैफ अली खान याची मुलगी सारा अली खान 'केदरानाथ' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आली. पदार्पणातच प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या साराने तिच्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकवर्ग तयार केला. सोबतच साराचं खासगी आयुष्यही प्रकाशझोतात आलं. नवोदित अभिनेता कार्तिक आर्यन याची आणि साराची ऑफस्क्रीन केमिस्ट्री कलावर्तुळात चर्चेचा विषय ठरली. 

मुख्य म्हणजे ऑफस्क्रीन केमिस्ट्रीच्या बळावरच या जोडीला एकत्र चित्रपट करण्याचीही संधी मिळाली. या चित्रपटातून आता सारा आणि कार्तिकच्या बहुचर्चित नात्याची एक वेगळी बाजू मोठ्या पडद्यावर पाहता येणार अशी चाहत्यांनी उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं जात आहे. 

नात्यात दुरावा येऊनही त्यांच्यातील मैत्री मात्र कायम आहे. निर्माता - जिग्दर्शक करण जोहर याच्या दिवाळी पार्टीमध्ये ही दुरावलेली जोडी पुन्हा एकत्र पाहायला मिळाली. सारा- कार्तिकचं ब्रेकअप झालं असलं तरीही ते एकमेकांचे खूप चांगले मित्र असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

गेल्या काही काळापासून हे दोघंही त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करत असल्यामुळे या नात्याला ते फारसा वेळ देऊ शकत नव्हते. त्यामुळे परस्पर सामंजस्यानेच त्यांनी हा निर्णय घेतल्याचं कळत आहे. येत्या काळात सारा- कार्तिक हे दोघंही इम्तियाज अली दिग्दर्शित चित्रपटातून झळकणार आहेत. त्याशिवाय सारा 'कुली नंबर १' या चित्रपटाच्या रिमेकमध्येही झळकणार आहे. या चित्रपटात ती वरुण धवन याच्यासोबत स्क्रीन शेअर करत आहे. तर, कार्तिक 'पती पत्नी और वो' या चित्रपटातून अनन्या पांडे आणि भूमी पे़डणेकर यांच्यासोबत दिसणार आहे.