Ira Khan च्या बॉयफ्रेंडला धमकीचा मेसेज, त्यानंतर त्यानं जे केलं ते...पाहा व्हिडीओ

हा मेसेज कोणी लिहिला हे कळू शकलेलं नाही, कारण त्याचं नाव व्हिडीओमध्ये नुपूरने लपवलं आहे.

Updated: Jul 14, 2022, 10:12 PM IST
Ira Khan च्या बॉयफ्रेंडला धमकीचा मेसेज, त्यानंतर त्यानं जे केलं ते...पाहा व्हिडीओ title=

मुंबई : आमिर खानची मुलगी आयरा खान आणि तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. या दोघांनीही अगदी कमी वयात आपल्या मधील नातं घट्टं आणि अधिकृत केलं आहे आणि ते नेहमीच आपल्या नात्याबद्दल सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या चाहत्यांना देखील त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला फारच आवडते. तसे पाहाता आयराची खूपच जास्त फॅन फॉलोइंग आहे. देशातूनच नाही तर परदेशातून देखील लोक आयराला फॉलो करतात.

आपल्याला तर माहित आहे की, सेलिब्रिटींचे काही फॅन इतके वेडे असतात की, ते आपल्या आवडत्या सेलिब्रिटीसाठी काहीही करायला तयार होतात. यासंबंधीत आधीच बऱ्याच बातम्या समोर आलेल्या आपण पाहिल्या किंवा ऐकल्या आहेत आणि असाच काहीसा प्रकार आयरा आणि नुपुरच्या बाबतीत घडला आहे.

खरंतर आयराच्या एका फॅनने नुपुरला धमकी दिली आहे की, ''तु आयरापासून लांब राहा ती फक्त माझीच आहे.'' या घटनेमुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा जोरदार चर्चा रंगली.

या घटनेबद्दल स्वत: नुपूरने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नुपूर सोफ्यावर बसून सोशल मीडिया स्क्रोल करत असते, तेव्हाच त्याला आयरा आणि त्याचा एक रोमँटिक व्हिडीओ दिसतो. परंतु हा रोमँटिक व्हिडीओ नुपूरला एका युजरने पाठवला, ज्यावर मेसेज करत त्याने लिहिले की, "आयरा माझं प्रेम आहे, तिला स्पर्शही करू नकोस"

हा मेसेज कोणी लिहिला हे कळू शकलेलं नाही, कारण त्याचं नाव व्हिडीओमध्ये नुपूरने लपवलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हे सगळं तर ठिक आहे. परंतु हा मेसेज वाचल्यावर नुपूर जे करतो ते खूपच मनोरंजक आहे. खरंतर हा मेसेज वाचून नुपूर जवळच काम करत असलेल्या आयराकडे जातो आणि तिला हळूच बोटांनी स्पर्श करतो. ज्यानंतर तो पुन्हा आयराकडे येतो आणि तिच्या गालावर किस्स करतो.

हा व्हिडीओ खूपच मजेदार आहे. इतक्या गंभीर गोष्टीला नुपूरने खूपच मजेदार पद्धतीने घेतलं आहे.