''बॅग पॅक कर आणि....'', प्रसिद्ध अभिनेत्याने डेब्यूपूर्वी Ranbir kapoor ला दिला सल्ला

सध्या सगळीकडेच चर्चा आहे रणबीर आणि आलियाच्या लग्नाची आणि लवकरच होणाऱ्या त्यांच्या बाळाची

Updated: Jul 21, 2022, 12:04 PM IST
''बॅग पॅक कर आणि....'', प्रसिद्ध अभिनेत्याने डेब्यूपूर्वी Ranbir kapoor ला दिला सल्ला  title=

मुंबईः सध्या रणबीर कपूर आपल्या शमशेरा या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात खुपच व्यस्त आहे त्यामुळे सतत मीडियासमोर येणाऱ्या रणबीरला सिनेमापेक्षा आलिया भट्ट आणि घरात येणाऱ्या नव्या पाहूण्याविषयी विचारले जाते आहे. आलिया आणि रणबीरचे नुकतेच यावर्षीच्या एप्रिलमध्ये लग्न झाले. त्यानंतर याच महिन्यात बरोबर दोन महिन्यानंतर आलियाने आपल्या प्रेग्नंन्सीबद्दल जाहीर खुलासा केला आहे. 

सध्या सगळीकडेच चर्चा आहे रणबीर आणि आलियाच्या लग्नाची आणि लवकरच होणाऱ्या त्यांच्या बाळाची. आता दोघेही आपापल्या शूटिंगमध्ये बिझी आहेत आणि दूसरीकडे रणबीर शमशेराच्या निमित्ताने सगळीकडे प्रमोशन करतो आहे. त्यातून आता तो मीडियासमोर आल्याने त्याला मीडिया त्याच्या खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारून भांडावून सोडते आहे. पर्सनल लाईफसोबत सध्या रणबीर त्याच्या करिअरच्याही अनेक गोष्टी मीडियासोबत शेअर करत आहे. 

शमशेरासोबत चार वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज झालेला अभिनेता रणबीर कपूर सध्या वेगळ्याच एका कारणामुळे फेमस आहे. काही वर्षांपुर्वी त्याने एका अशा बड्या अभिनेत्याकडून सल्ला घ्यायचे टाळले होते आणि त्यामुळे सध्या ती व्यक्ती आणि ते वक्तव्यही व्हायरल झाले आहे  

रणबीर अभिनेता होण्यापूर्वीच त्याच्या सिनिअरने म्हणजे आमीर खानने त्याला एक सल्ला दिला होता. पण रणबीर कपूरने त्यावेळेस या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले आणि आता त्याला त्याचा फारच पश्चाताप होत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रणबीर हाच एक मोठा खुलासा केला आहे. 

अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी आमिरने त्याला बस आणि ट्रेनने संपूर्ण भारताचा प्रवास करण्यास सांगितले होते. त्याने शेअर केले, “मी अभिनेता होण्यापूर्वी, आमिर खानने मला सांगितले होते, 'तू अभिनेता होण्यापूर्वी तुझी बॅग भर आणि भारतभर प्रवास कर. बस, ट्रेनने प्रवास कर आणि छोट्या शहरांमध्ये जा. आपल्यापैकी बहुतेक लोक जे ऐषोआरामात वाढलेले आहेत त्यांना आपला देश आणि त्याची वैविध्यपूर्ण संस्कृती माहीत नाही.” पण रणबीरने आमिरचा सल्ला गांभीर्याने घेतला नाही. "तो सल्ला माझ्यासाठी एक चांगला धडा होता, पण मी तो घेतला नाही कारण तेव्हा मला वाटलं, 'ये क्या बोल रहा है'," असं रणबीरने सांगितले. 

शमशेरामध्ये रणबीर दुहेरी भूमिकेत आहे. या अॅक्शन-ड्रामामध्ये संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत आहे.