स्पेनच्या बीचवर वयाच्या ५० वर्षी 'या' बॉलिवूड अभिनेत्रीने बिकिनीत फ्लॉन्ट केली फिगर, पाहा फोटो

५० वर्षाच्या अभिनेत्रीचे बिकिनी फोटो सोशल मीडियावर व्हायरल, चाहतेही घायाळ   

Updated: Jul 21, 2022, 01:36 PM IST
स्पेनच्या बीचवर वयाच्या ५० वर्षी 'या' बॉलिवूड अभिनेत्रीने बिकिनीत फ्लॉन्ट केली फिगर, पाहा फोटो title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी ही चित्रपटसृष्टी सक्रिय नसली तरी ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मंदिरा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. सध्या मंदिरा ही डेनमार्क तर कधी स्पेनमध्ये तिच्या सुट्टीचा आनंद घेत आहे. यावेळी मंदिराने तिचे बिकिनीमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

मंदिराने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोमध्ये मंदिराने कलरफूल बिकिनी परिधान केली आहे. समुद्राच्या किनारी ती ज्युसचा आनंद घेताना दिसते. याशिवाय मंदिराने निळ्या रंगाच्या डेनिम शार्टमधले काही फोटो शेअर केले आहेत. तिच्यासोबत तिची मुलं वीर आणि निशा देखील दिसत आहेत. वयाच्या ५० व्या वर्षी मंदिराला फिट पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मंदिराचा पती राज कौशल यांचं गेल्या वर्षी निधन झालं होतं. त्यांना ३० जून रोजी एक वर्ष पूर्ण झालं असून मंदिराने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये मंदिराने '365 दिवस तुझ्याशिवाय...' असं लिहिलं आहे. एवढंच नाही तर, 'Miss you Raji...' असं लिहिलं आहे. सध्या तिची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली होती.