आमिरचा लेकच त्याला देणार तगडी स्पर्धा? Viral Photos पाहून निर्मात्यांमध्येही चर्चा

Junaid Khan: सध्या सोशल मीडियावर आमिर खानच्या मोठ्या मुलाची चर्चा आहे. त्याचा एक हटके लुक हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यामुळे तो बॉलिवू़डमध्ये पदार्पण करणार का याची जोरात चर्चा रंगलेली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Oct 20, 2023, 02:55 PM IST
आमिरचा लेकच त्याला देणार तगडी स्पर्धा? Viral Photos पाहून निर्मात्यांमध्येही चर्चा title=
amir khan son junaid khan new photoshoot goes viral on instagram

Junaid Khan: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे आमिर खानच्या लेकाची. जुनैद खानची सोशल मीडियावरही बरीच चर्चा असते. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे फोटो हे सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले आहेत. आता त्याचा अजून असाच एक फोटो हा व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्याची बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. सध्या त्याच्या या फोटोशूटमुळे आता तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार का याची जोरात चर्चा रंगलेली आहे. मागे एकदा देखील त्याचा नवा लुक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानं पुर्णत: आपलं ट्रान्सफॉर्मेशन केले आहे. त्यामुळे आता बॉलिवूडमध्ये येऊन आपल्याच वडिलांना तगडी स्पर्धा जुनैद वयाच्या तिशीत देणार का याचीही जोरात चर्चा आहे. आयरा खान हिनं अद्यापही बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं नाही. त्यातून ती आपल्या परीनं समाजकार्य करते. त्याचसोबत ती नाटकांमध्येही सक्रीय आहे. 

जुनैद खान यानंही अद्याप बॉलिवूडमधून पदार्पण केलेले नाही. परंतु सध्या त्याच्या व्हायरल झालेल्या या फोटोशूटमधून आता निर्मात्यांमध्येही चर्चा पिकू लागली असेल. सध्या आमिर खान हा ब्रेकवर आहे. तो अनेकदा विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतो. त्यामुळे तो अनेकदा स्पॉट होताना दिसतो. काही दिवसांपुर्वी आमिर खानचाही लूक पुर्णपणे बदललेला दिसला होता. त्यातून तोही आता नव्या चित्रपटांतून काम करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता नव्यानं तो कोणता चित्रपट करणार याची चर्चा आहे. मागील वर्षी त्याचा 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट सुपरफ्लॉप झाला होता. हा चित्रपट अनेकांना आवडलाही होता. परंतु यावर बॉयकॉटचे इतके नारे लागले की काही विचारू नका. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला. त्यामुळे अपसेट झालेला आमिर खान आता कोणत्या नव्या चित्रपटातून दिसणार याची जोरात चर्चा होती. 

हेही वाचा : आलियाच्या घरी 'ती' थाटामाटात आली! हार घालून केलं स्वागत, VIDEO पाहिलात?

सध्या आमिर खानचा एक लुक व्हायरल झाला आहे. त्यानं सॉलिड फोटोशूट केलं आहे. हा लुक सध्या सर्वत्र व्हायरल होतो आहे. त्यांचे हे फोटोशूट प्रसिद्ध बॉलिवूड फोटोग्राफर अविनाश गोवारीकर यांनी केले आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकांऊटवरून त्यांनी जुनैदचे फोटो शेअर केले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जुनैद हा मनोरंजन चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज आहे. तो दाक्षिणात्त्य अभिनत्री साई पल्लवी हिच्यासोबत आपला पहिला चित्रपट करणार आहे. त्यानं याआधीही थिएटरमधून काम केले आहे. 6 वर्षे तो थिएटरमध्ये काम करत होता. यावेळी फोटोशूटमधला त्याचा लुक हा फारच चार्मिंग आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यावेळी त्याचे केस हे फारच मेस्सी आहे आणि त्याचा लुकही हॅण्डसम आहे. यावेळी त्यानं कॉटनचा कुर्ता परिधान केला आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा आहे. नेटकऱ्यांनीही त्याच्या या लुकवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.