आलियाच्या घरी 'ती' थाटामाटात आली! हार घालून केलं स्वागत, VIDEO पाहिलात?

Alia Bhatt New Car:  सध्या आलिया भट्टची सोशल मीडियावर जोरात चर्चा आहे. नुकताच तिला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान (National Awards) करण्यात आला आहे. त्यामुळे तिची जोरात चर्चा आहे. आता तिच्या नव्या गाडीची सर्वत्र जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Oct 20, 2023, 01:41 PM IST
आलियाच्या घरी 'ती' थाटामाटात आली! हार घालून केलं स्वागत, VIDEO पाहिलात?  title=
alia bhatt new range rover audibiography car comes home video viral

Alia Bhatt New Car: आलिया भट्ट हिची अनेकदा चर्चा रंगलेली असते. नुकताच तिला 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटातील भुमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. नुकताच दिल्ली येथे राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पार पाडला. यावेळी आलिया भट्टसह रणबीर कपूरही उपस्थित होता. पुरस्कार स्विकारताना आलिया भट्टही भावूक झाली होती. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या आयुष्यात ही मोठी घटना घडण्यापुर्वी दोन गोष्टी झाल्या. काही दिवसांपुर्वी रणबीर कपूरला ईडीचं समन्स आलं. महादेव अॅप प्रकरणातील हे समन्स होते. या प्रकरणात रणबीर कपूरसह अन्य अनेक बॉलिवूडच्या सेलिब्रेटींनाही याबाबत समन्स देण्यात आले होते. त्यामुळे त्याची बरीच चर्चा होती. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आलिया भट्टनं महागडी गाडी घेतली होती. ज्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता तिची ही लक्झरीयस कार तिच्या घरी आली आहे. त्यामुळे तिच्या या नव्या गाडीची परच चर्चा आहे. 

सध्या तिच्या नव्या कारची झलक पाहून तिच्या चाहत्यांमध्ये फक्त याचीच चर्चा रंगलेली आहे. तिच्या गाडीचा रंग हा काळा आहे आणि या गाडाची पुजा केल्यानंतर त्या गाडीला लावलेला झेंडूच्या फुलांचा हार दिसतो आहे. तिची कार आता फायनली तिच्या घरी आली आहे. आलिया भट्टनं रेंज रोवर ऑटोबायोग्राफी लॉन्ग व्हिल कार खरेदी केली आहे. रेंज रोवर ही सर्वात महागडी कार आहे. या कारची किंमत ही 3.81 कोटी रूपये इतकी आहे. अशी माहिती मीडिया रिपोर्टनुसार समजते आहे. आलिया भट्टकडे अनेक महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे. त्यातून तिच्याकडे काळ्या रंगांच्या गाड्या अधिक आहेत असं दिसून आलं आहे. 

हेही वाचा : कंगना राणावतच्या 'इमर्जन्सी'नंतर अनुपम खेर यांचा नवा बायोपिक

आलियाच्या गाड्यांचे कलेक्शन; आता नव्या गाडीचेही आगमन : 

आलियाकडे रेंज रोवर गाड्यांचे कलेक्शन हे अधिक आहेत. त्यात लॅंड रोवर रेंज रोवर व्होग, ऑडी A6, BMW 7-Series, Audi Q5, Audi Q7 या गाण्यांचा समावेश आहे. त्यातून आता ही नवी गाडीही तिच्या या कार कलेक्शनच्या परिवारात सामील झाली आहे. रणबीरकडेही कार्सचे भले मोठे कलेक्शन आहेत. आलियाप्रमाणे लॅंड रोवर रेंज ऑटोबायोग्राफी, Audi A8 L, Mercedes-Benz G63, Audi A8 L, Audi R8 अशा अनेक गाड्यांचा समावेश आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आलियाचे नवे चित्रपट : 

हे वर्षे आलियासाठी खूपच चांगले होते. 2023 मध्ये तिचे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. एक म्हणजे तिचा हॉलिवूडचा चित्रपट हा प्रदर्शित झाला आहे. ज्यात तिला Gal Galot सोबत दिली होती. यात तिनं विलनचं काम केले आहे. सोबत तिचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. जो बॉक्स ऑफिसवरही हीट झाला. आता 2024 मध्ये तिचा 'जिगरा' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.