अमिरच्या मुलीचा बोल्ड अंदाज

चाहत्यांना केलं घायाळ...

Updated: Dec 17, 2019, 01:37 PM IST
अमिरच्या मुलीचा बोल्ड अंदाज

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून इरा खान चांगलीच चर्चेत आहे. कधी तिच्या प्रेम प्रकरणावरून तर कधी सोशल मीडियावरील फोटोंमुळे तिच्या चर्चा रंगत असतात. आमिर खानची मुलगी इरा ही नेहमीच प्रसारमाध्यमांपासून दूर असते. पण ती इन्स्टाग्राम आणि सोशल नेटवर्किंग साईटवर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोमुळे तिच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

इराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले तरी तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. खुद्द इराने तिचे बोल्ड अंदाजातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोमध्ये तिने निळ्या रंगाचा बॅकलेस गाऊन घातला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

What a view..@photographybyroozbeh  #whataview #seasonsmumbai #shoot #photooft

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

What a view...@photographybyroozbeh .#whataview #seasonsmumbai #shoot #photooftheday

 

बॅकलेस गाउनमधील तिचा बोल्ड लूक चाहत्यांना घायाळ करत आहे. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत तिने 'काय नजारा आहे..' असे कॅप्शन दिले आहे. आतापर्यंत २१ हजारांपेक्षा जास्त चाहत्यांनी तिच्या या फोटोंना लाईक केलं आहे. 

इराने अभिनय क्षेत्रात डेब्यू केले नसले तरी दिग्दर्शकाच्या रूपात तिने सिनेविश्वात पदार्पण केले आहे. थिअटर प्रोडक्शन 'यूरिपिडिस मेडिया' माध्यमातून तिने कलाविश्वात पदार्पण केले आहे. तर अभिनय क्षेत्रात ती कधी पदार्पण करेल याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

काही दिवसांपूर्वी तिचं प्रेम प्रकरण चांगलंच गाजलं होतं. तिच्या बॉयफ्रेंड सोबतचे खुप सारे फोटो तिने शेअर केले आहेत. यातून त्यांतील जवळीकता सोशल मिडियावर दिसून येत आहे. इरा ही आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ता यांची मुलगी आहे.