मुंबई : 'अपना टाईम आयेगा...' म्हणत अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट स्टारर 'गली बॉय' चित्रपटाने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. शिवाय कलाकारांसाठी बहुमोलाचा समजला जाणाऱ्या 'ऑस्कर'च्या यादीमध्ये देखील चित्रपटने एन्ट्री मारली होती. भारताकडून ऑस्करच्या सर्वोत्तम परदेशी भाषा चित्रपट विभागासाठी ‘गली बॉय’ चित्रपटाची निवड करण्यात आली होती. परंतु या शर्यतीमधून 'गली बॉय' बाहेर पडला आहे.
सोमवारी १६ डिसेंबर रोजी अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अँड सायन्सने जाहीर केलेल्या सर्वोत्तम दहा परदेशी भाषांमधील चित्रपटांच्या यादीमध्ये ‘गली बॉय’ला स्थान मिळालेले नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
They're here - announcing the Oscars shortlistshttps://t.co/jYEjR6VSDD
— The Academy (@TheAcademy) December 16, 2019
या यादीमध्ये या यादीमध्ये 'द पेन्टेड बर्ड' , 'ट्रूथ अॅण्ड जस्टिस' , 'लेस मिसरेब्लस' , 'दोज हू रीमेन्स' , 'हनीलँड', 'कॉर्पस क्रिस्टी' , 'बीनपोल' , 'अटलांटिक्स' , 'पॅरासाईट', आणि 'पेन अॅण्ड ग्लोरी' या चित्रपटांनी स्थान पटकावले आहे.
मुंबईच्या गल्लीबोळात राहणाऱ्या तरुणाईच्या मनाती स्वप्नांना भरारी देत, त्याच स्वप्नांचा आधार घेत यशशिखरापर्यंत पोहोचण्याची एक वास्तवदर्शी कथा झोया अख्तर हिने 'गली बॉय' या चित्रपटातून साकारली. रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्यासह अनेक कलाकारांच्या उल्लेखनीय भूमिका असणाऱ्या या चित्रपटाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला.
'गली बॉय'च्या निमित्ताने मुराद, सफिना, एम.सी.शेर, अशी पात्र रुपेरी पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यांना साथ होती ती म्हणजे लोकप्रिय रॅपर्स नॅझी आणि डिव्हाईन यांच्या खऱ्याखुऱ्या यशोगाथेची, संघर्षाची.