न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर बीग बींच्या नातीचं वर्कआऊट, व्हिडिओ व्हायरल

बिग बींच्या नातीचा व्हिडिओ होतोय व्हायरल

Updated: Jun 20, 2019, 02:09 PM IST
न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर बीग बींच्या नातीचं वर्कआऊट, व्हिडिओ व्हायरल

मुंबई : सर्वच सेलेब्रिटी आपल्या फिटनेसवर विशेष लक्ष देतात. फिटनेसच्या बाबतीत आपण अनेकदा कलाकारांना स्वता:ची काळजी घेतांना पाहतो. कोण दररोज जिमला जातं, तर कोणी न चुकता योगा करतात. या संबंधित अनेक सेलेब्रिटीचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. त्यातच आता आणखी एक भर पडली आहे.

Add Zee News as a Preferred Source

सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा व्हिडिओ आहे बॉलिवूडचे महानायक अभिताभ बच्चन यांच्या नातीचा.  अभिताभ यांची नात नव्या नवेली नंदा सध्या न्यूयॉर्कमध्ये शिकत आहे. न्यूयॉर्कमध्ये वर्कआऊट करताना तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत अनेक लाईक्स देखील मिळाले आहेत. महानायक अमिताभ बच्चन यांची नात न्यूयॉर्कच्या फूटपाथवर एक्सरसाईज करतांना या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#fitness . . . . . .#navyananda #navyanavelinanda

A post shared by Navya Naveli Nanda® (@naavyananda) on

हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. नव्या नवेली नंदा हिचे फोटो सेंसेशन बनायला जास्त वेळ लागत नाही. मात्र हा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस पडला आहे. नव्या नवेली नंदा फिटनेससाठी बरीच मेहनत घेत आहे. हा व्हिडिओ नव्या नवेली नंदाच्या फॅन्स क्लब पेज इनस्टाग्रामवरून शेअर केला आहे. महानायक अभिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा यांची नव्या ही मुलगी आहे. ती कोणत्याही चित्रपटात झळकली नाही. मात्र तिचे सोशल मीडियावर अनेक फॅन्स आहे. नव्या सध्या न्यूयॉर्कमध्ये फोरडम युनिवर्सिटीमध्ये शिक्षण घेत आहे.  

About the Author